मोठी बातमी! 'त्या' विरोधात काँग्रेस न्यायालयात जाणार; नाना पटोले यांनी केले गंभीर आरोप
Allegations of Nana Patole- निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्या होत्या. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही पत्रकार परिषद घेत भाष्य केलंय. निवडणूक आयोगालाच त्यांनी थेट प्रश्न विचारल्याने पटोले यांच्या विधानाच्या चर्चा वाढल्या आहेत.

काँग्रेस जाणार न्यायालयात
संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर नाना पटोले यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, "मतदानाच्या टक्केवारीत प्रचंड तफावत असल्याचं दिसत आहे. याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. रात्री उशीरापर्यंत कोणत्या मतदान केंद्रावर मतदान सुरु होतं, हे निवडणूक आयोगाने सांगावं. राज्यात किती वाजेपर्यंत मतदान सुरु होतं..? याचे फुटेज आम्हाला मिळायला हवे. ७६ लाख मतदानाची वाढ कशी झाली..?", असे अनेक सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केले. तसेच निवडणूक आयोगाने निकालानंतर पत्रकार परिषद का घेतली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
नाना पटोलेंनी विचारले प्रश्न...
पटोले म्हणाले, "महाराष्ट्रातील मतदानाच्या टक्केवारीत फरक जाणवतो. जवळपास ७६ लाख मतदान वाढल्याचं दिसतंय. मतदानाची ही वाढ कशी झाली..? रात्री साडेअकरा वाजेपर्यंत मतदान झाल्याचं आम्हाला सांगितलं जातंय, मग जर एवढा वेळ मतदान सुरु होतं तर कमीत कमी दोन ते तीन किलोमिटरच्या मतदारांच्या रांगा असायला हव्यात. मग निवडणुका पारदर्शक घेण्यासाठी निवडणूक आयोग फोटो, व्हिडीओ वैगेरे काढत असतं. मग निवडणूक आयोगाने आम्हाला रात्री मतदारांच्या रांगा लागल्या होत्या की नाही, याचे फोटो दाखवावेत. असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.
रात्रीतून टक्केवारी कशी वाढली?
निवडणूक आयोगाला पटोले यांनी काही प्रश्न विचारले. ते म्हणाले, "मतदानाच्या दिवशी दिलेली आकडेवारी आणि दुसऱ्या दिवशी आलेली आकडेवारी यात तफावत आहे. मतदान जवळपास ७.५ टक्क्यांनी वाढलं होतं. मग याचं उत्तर आम्हाला निवडणूक आयोगाने द्यावं. निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. निवडणूक आयोगाने याचं उत्तर दिलं पाहिजे. तसेच सायंकाळी साडेपाच वाजता मतदान झालेले आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ आम्हाला निवडणूक आयोगाने दिले पाहिजे. हे मतदान कोणत्या केंद्रावर झालं? साडेसात टक्क्यांनी मतदान कसं वाढलं?", असे प्रश्न नाना पटोले यांनी आयोगाला विचारले आहेत.












Click it and Unblock the Notifications