Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

काँग्रेसला मोठा धक्का..! 'आता मला मुक्त करा...' नाना पटोलेंचे थेट मल्लिकार्जुन खर्गेंना पत्र

Letter from Nana Patole to Kharge- लोकसभेला दाखविलेली जादू, काँग्रेसला विधानसभेला कायम ठेवता आली नाही. लोकसभेला महाराष्ट्रात १३ जागा जिंकणारी काँग्रेस, विधानसभेला फक्त १७ जागा जिंकू शकली. काँग्रेसच्या पडझडीची जबाबदारी स्विकारत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवत त्यांनी मला प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करा, असं म्हटलं आहे. हा महाराष्ट्र काँग्रेससाठी मोठा धक्का समजला जात आहे.

Letter from Nana Patole to Kharge

विधानसभेला काँग्रेसचं पानिपत

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं होतं. 13 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, विधानसभेला ही जादू कायम ठेवता आली नाही. काँग्रेसला फक्त 17 जागा जिंकता आल्या. त्याऊलट महायुतीने जोरदार कमबॅक करत 237 जागांवर विजय मिळवला. भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकत नंबर वन पक्ष होण्याचा मान मिळवला. महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षांना जोरदार पराभवाला सामोरं जावं लागलं. काँग्रेसच्या या पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरु झाल्या.

पटोले यांच्या राजीनाम्याच्या चर्चा

काँग्रेसने विधानसभेत सपाटून मार खाल्य्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबतची नाराजी थेट उघडपणे बोलून दाखविण्यात आली. नागपूर येथील पक्षाच्या बैठकीत अनेकांनी प्रदेशाध्यक्ष प्रचारासाठी फिरलेच नसल्याचा आरोप केला. नाना पटोले यांना पदावरुन पायउतार करावं, अशा चर्चाही काँग्रेसच्या एका गोटातून सुरु झाल्या. त्यानंतर नाना पटोले यांच्या कार्यालयातून मात्र या चर्चांना पूर्णविराम देण्यात आला. पटोले असा कोणताही निर्णय घेणार नाहीत किंवा श्रेष्ठींचाही असा कोणताच विचार नसल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.

पटोले यांनी पाठवले दिल्लीला पत्र

दरम्यान, आता राज्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केल्याचं समजते. त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून जबाबदारीतून मुक्त करावे असे म्हटले आहे. गेल्या 4 वर्षांपासून मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असल्याचंही त्यांनी म्हटलंय. नाना पटोले यांनी स्वत:च राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहून प्रदेशाध्यक्ष पदातून पदमुक्त करण्याची विनंती केल्याची माहिती आहे. त्यामुळे, आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काँग्रेसमध्येही नाना पटोले यांना काही बड्या नेत्यांचा अंतर्गत विरोध असल्याची माहिती आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+