विरोधी पक्षांवर खापर कसले फोडता? मोदीच खरे भ्रष्टाचाराचे सरदार! नाना पटोलेंचा यांचा थेट हल्लाबोल
मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भ्रष्टाचाराचे सरदार म्हणत आहेत. त्यांच्यावर आरोपही केले आहेत पण मुळातः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भ्रष्टाचाराचे सरदार आहेत असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनेच पेटवला आहे. मराठा आरक्षण रखडण्याचे पापही भाजप आणि फडणवीसांचेच आहे. 2014 साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते पण त्यानंतर सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर केले नाही म्हणून ते आरक्षण गेले.

मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी देवेंद्र फडणवीसच आहेत. सत्तेत आल्यास मराठा, धनगर, हलबा, यांच्यासह विविध जाती जमातींना आरक्षण देण्याचे आश्वासन 2014 साली फडणवीस यांनीच दिले होते. आता या आश्वासनांची पूर्तता करण्याची जबाबदारी सरकार व फडणवीसांची असताना विरोधी पक्षांवर खापर कसले फोडता? असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी पत्रकार परिषेदत विचारला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात शरद पवार यांना भ्रष्टाचाराचा सरदार म्हटले. केंद्रातील भाजप सरकारनेच 2014 साली शरद पवार यांनी पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आणि आता त्यांना शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार कसे वाटू लागले. देशात भ्रष्टाचाराचा सरदार कोण असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत,अशी नाना पटोले यांनी टीका केली ...
विशाळगडावरील दंगल सरकार पुरस्कृत..
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमणाचा विषय व गडाच्याखाली असलेल्या गजापूर गावातील दंगल ही सरकार पुरस्कृत होती असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला आहे. 20 जून 2024 रोजी स्वराज्याची राजधानी रायगडावरील सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातच, विशाळगडाचा करेक्ट कार्यक्रम, करतो असे म्हटले होते.
त्यानंतर 14 जुलै रोजी अतिक्रमणाच्या नावाखाली दंगली घडवून आणल्या. स्थानिकांनी 5 जुलै रोजीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अशी घटना घडू शकते असे सांगितले होते. 12 जुलै रोजी अर्जही दिला होता तरीही शासन वा प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही, हे विशेष असेही नाना पटोले यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications