महाराष्ट्र हादरला ! पोटच्या तीन मुलींवर बापाचाच लैंगिक अत्याचार; एकाच मुलीचा चार वेळा गर्भपात
पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात तरुणीवर अत्याचाराची घटना ताजी असताना आता मुंबईतून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका बापानेच आपल्या पोटच्या तीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले असून, त्यापैकी एका मुलीचा चार वेळा गर्भपात केला आहे. याप्रकरणी नाालासोपारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आसून बाप फरार आहे.

आरोपीचा गुन्हेगारी पार्श्वभूमी
या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या बाप हा ५६ वर्षीय असून, तो फरार आहे. आरोपी असलेला वासनांध विकृत बाप हा कुख्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्यावर खंडणी, गोळीबार, हत्या, सुपारी घेऊन हत्या, दरोडा, चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 2017 पासून या विकृत वासनांध बापाने आपल्याच मुली, पत्नी यांना दहशतीखाली ठेवून पोटच्या तीन मुलीवर अत्याचार केले आहेत. या विकृताला 5 मुली, पत्नी, आणि एक मुलगा आहे. आईला ही घटना माहीत झाल्यानंतर तिला ही मारहाण करण्यात आली आहे.
आईने मुलांना घेऊन घर सोडले
मुळचे कोकणातील असलेले हे कुटुंब वडीलांच्या सततच्या जाचाला कंटाळून मुंबईत नातेवाईकाच्या आश्रयाला आले. आरोपी नराधमला एकूण ५ मुली असून गावी असताना तो या मुलींवर बळजबरी करुन त्यांचे लैंगिक शोषण करायचा. यापैकी एका मुलीचा चार वेळा गर्भपात देखील करण्यात आला. अखेर वडिलांच्या छळाला कंटाळून आई पाचही मुलींना घेऊन नालासोपारा येथे एका नातेवाईकाच्या आश्रयाला आली.
मुलीचा चारवेळा गर्भपात
मुलींचा 56 वर्षीय पिता कुख्यात गुन्हेगार आहे. त्याला पाच मुली आहेत. कोकणातील गावी असताना तो या मुलींवर बळजबरी करून बलात्कार करत होता. यापैकी एका मुलीचा चारवेळा गर्भपातही करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या तीन मुलींपैकी मोठी मुलगी 21 वर्षांची असून अन्य दोन मुली या अल्पवयीन आहेत. वडिलांकडून होत असलेल्या अत्याराचाविरोधात तक्रार नोंदवण्याचा निर्णय त्यांनी हिंमतीने घेतला. मोठ्या मुलीने याबाबतची फिर्याद दिली आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.












Click it and Unblock the Notifications