Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नागपूर हिंसाचारातील मास्टमाइंड फहीम खान कोण आहे?, गडकरींविरुद्धही लढला, जाणून घ्या त्याच्याविषयी

Who is Faheem Khan, Nagpur Voilance : नागपूरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचाराबाबत महत्त्वाची आपडेट समोर आली आहे. फहीम शमीम खान हा सदर घटनेमागील मास्टरमाईंड असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. फहीम खान मायनॉरिटी डेमॉक्रॅटीक पार्टीचा शहर अध्यक्ष आहे.

महत्वाचं म्हणजे हाच फहीम खान पोलीस स्टेशनला निवेदन देण्यास गेला होता. दरम्यान, एफआयआर दाखल झाल्यानंतर अखेर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला पोलिसांनी 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याची पुढील चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, हा फहीम खान कोण, त्याचा राजकीय प्रवास काय आहे. याविषयी सर्व काही जाणून घेऊया.

Nagpur Violence

नागपूरात नेमकं काय झालंय?

नागपूरमधील तणावाबाबत पोलिसांनी 51 लोकांवर एफआयआर नोंदवला आहे. यामध्ये फहीम शमीम खान याचं नाव आघाडीवर होते. फहीम खाननेच सगळ्यातआधी त्या दिवशी सकाळी 11 वाजता 30 ते 40 जणांचा जमा केले आणि पोलिसांना निवेदन देण्यास गेला.

यावेळी विहिंप आणि बजरंग दल कार्यकर्त्यांविरोधात आरोप फहीम खानने पोलिसांकडे केले. यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यानंतर देखील फहीम खानने पुन्हा जमाव एकत्र केला आणि तणाव निर्माण करण्यास सुरुवात केली.

दहावीपर्यंत शिक्षण, मग पक्षात केली एंट्री

फहीम खान 38 वर्षांचा असून त्याचं दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. फहीम खानने हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त करत होता. पोलिस हिंदु समाजाचे आहेत, आपली मदत ते करत नाही, असं सांगत फहीम खान आंदोलनकर्त्यांना भडकवत होता, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या विधानसभा निवडणूक फहीम खानने निवडणूक देखील लढवली होती. मात्र त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.

11 पोलिस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम

नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 या भागातील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गरज नसताना या भागातील लोकांनी घराबाहेर निघू नये, तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी जमू नये, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु असून लोक नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, अद्याप नागपूर शहरातील काही भागात तणावपूर्ण शांतता कायम असल्याचे दिसत आहे.

21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली

हिंसाचार प्रकरणातील मास्टरमांइडच्या मुसक्या आवळ्यात पोलिसांना यश आले आहे. फहीम शमीम खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यानंतर त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला 21 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

त्याच्यासोबत अटक केलेल्या 51 जणांनाही पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी दावा केला की, 40 वर्षीय फहीमने दंगल भडकवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

गडकरींविरुद्ध निवडणुकही लढवली होती

2024 ची लोकसभा निवडणूक नागपूर मतदारसंघातून मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) च्या तिकिटावर लढवली, ज्यामध्ये त्याला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर, तो राजकीयदृष्ट्या सक्रिय झाला आणि शहरात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत होता.

औरंगजेबाच्या कबरीवरुन रंगला वाद

अभिनेता विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट काही काळापूर्वी प्रदर्शित झाला होता, त्यानंतर औरंगजेबचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही दिवसांपूर्वी औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत बोलले होते. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाला एक चांगला शासक म्हणत औरंगजेब क्रूर नव्हता असे त्यांचे मत असल्याचे म्हटले तेव्हा वाद आणखी वाढला.

चित्रपटांमधून औरंगजेबाची चुकीची प्रतिमा सादर केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. तेव्हापासून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी तीव्र झाली आहे. काही काळापूर्वी, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने धमकी दिली होती की जर सरकारने औरंगजेबाची कबर हटवली नाही तर बाबरीसारखीच तेथील अवस्था केली जाईल. त्यावरुन महाराष्ट्रात सद्या तणावाची स्थिती निर्माण झाली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+