Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नागपूर हिंसाचारात मोठी अपडेट; बांग्लादेश कनेक्शन? ६ जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

नागपूरमध्ये सोमवारी मोठा हिंसाचार झाला. महाल भागात दोन गटांत झालेल्या राड्यातून दगडफेकीची घटना घडली. पेट्रोल बाँम्बही टाकण्यात आले. पोलिसांवर हल्ला करुन जाळपोळ व गाड्यांची नासधूसही करण्यात आली. या प्रकारामुळे नागपुरात अद्यापही संचारबंदी लागू आहे. या प्रकरणात अनेक पोलिस व अग्निशामक दलाचे जवानही जखमी झाले आहेत. याच प्रकरणावर नुकतीच पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली.

Nagpur violence update

पोलिसांची पत्रकार परिषद

सायबर विभागाचे डीसीपी लोहित मतांनी यांनी या प्रकरणात महत्वाची माहिती दिली. हा प्रकार करणारे आरोपी नागपूरचे नसल्याचा महत्वाचा खुलासा त्यांनी केला. सध्या पोलिसांकडून सोशल मीडियावरील पोस्ट ब्लॉक करण्याचे काम सुरू आहे. नागपूर हिंसाचाराला कारणीभूत ठरलेले व्हिडिओ इतर देशातील आहेत. सायबर पोलिसांना तपासात हिंसाचार भडकवणारे तब्बल 172 व्हिडिओ सापडले होते.

बांग्लादेशचे कनेक्शन

पोलिसांनी आत्तापर्यंत पन्नासच्या आसपास लोकांना अटक केली. फहीम खान हाच या सगळ्या हिंसाचारामागचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप आहेत. त्याच्या सोशल मीडियावर वादग्रस्त कंटेट सापडला आहे. बांगलादेश आणि इतर काही ठिकाणांहून त्याने पेजेस चालवल्याचा आरोप आहे. त्याचे सर्व फेसबुक पेजेस ब्लॉक करण्यात आले आहेत. त्याच्या 50 टक्के वादग्रस्त पोस्ट ब्लॉकही झाल्या आहेत. फहीम खान याच्यावर आधीचेही गुन्हे आहेत.

फहीमवर देशद्रोहाचा गुन्हा

पोलिसांच्या विरोधात जी दगडफेक झाली त्याचं ग्लोरिफिकेशन केलं गेलं. अल्ला हू अकबर आणि सर तन से जुदा असे कॅप्शन काही पोस्टखाली आढळलं. हे ज्यांनी केलं त्यांच्याविरोधात 30/25 कलमांतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहीम खान सहीत सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. अजून काही लोकांवरही असाच गुन्हा दाखल होईल, असंही पोलिसांनी सांगितलं. या सगळ्यामागे बांग्लादेशचे कनेक्शन आहे का, हे तपासात समोर येणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+