Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Nagpur Train Accident : शालीमार एक्सप्रेसचे दोन डब्बे घसरले, सुदैवाने जीवितहानी टळली, पण...

Nagpur Train Accident : नागपूरमध्ये रेल्वे अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. शालिमार एक्स्प्रेसचे एस टू आणि पार्सलचे दोन डबे रेल्वे रुळावरुन खाली उतरले आहे. सुदैवाने या अपघातात कोणताही जीवितहानी झालेली नाही. पण, या घटनेने सर्वत्र गोंधळ उडाला. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, शालिमार एक्स्प्रेसचे एस टू आणि पार्सलचे दोन डबे ट्रकवरून खाली उतरले आहे. कुर्ला- शालिमारकडे एक्स्प्रेस नागपुरातून जात असताना कळमना भागातून काही अंतरावर अचानक रेल्वेचे दोन डबे पटरीच्या खाली उतरले. यात एस टू आणि पार्सलचा एक डबा आहे.

Nagpur Train Accident

एक्सप्रेसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर रेल्वे प्रशासनाकडून काम केले जात आहे. या मार्गावरील काही गाड्या प्रभावीत झालेल्या आहे.

तसंच काहींचे मार्ग बदलण्यात आले आहे. दुरुस्तीचं काम हे काम युद्धपातळीवर सुरू असून पूर्ववत होण्यासाठी आणखी दोन ते तीन तासापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे, असेही रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+