Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

"अर्जंट पैसे पाठवं" शिक्षक भरती घोटाळ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल! 5 मुद्यात समजून घ्या घोटाळा नेमका काय

Nagpur teacher recruitment scam audio clip goes viral : नागपूर विभागात झालेल्या 580 शिक्षकांच्या नियुक्त्या संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या भरतीत मोठा घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे. या भरती घोटाळ्याची एक व्हायरल ऑडियो क्लिपही समोर आली आहे, दरम्यान या संदर्भात दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, बनावट शालार्थ ओळखप्रमाणपत्रांद्वारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रीया राबवण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. बनावट गोष्टींद्वारे नियुक्त्या करुन सरकारची कोट्यवधींची फसवणूकही झाली आहे. 580 नियुक्त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. आता 580 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होतात का आणि त्यांच्याकडून त्यांना प्राप्त झालेला पगार वसूल केला जाणार का? हे लवकरच कळेल.

Nagpur teacher recruitment scam audio clip

किती पदांसाठी होती भरती

साम टिव्हीच्या वृत्तानुसार, नागपूर विभागात झालेल्या शिक्षक भरतीनंतर घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात पाच अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

Take a Poll

हा घोटाळा नेमका काय आहे?

1. शिक्षण उपसंचालक माध्यमिक शिक्षण विभाग, वेतन पथक कार्यालयाची साखळी आहे.

2. 'सेटर'नं नियुक्तीचा प्रस्ताव आणला की, अधिकाऱ्यांच्या सहमतीने निर्णय घेतला जात होता.

3. यामध्ये सर्वांचा हिस्सा ठरायचा आणि नियुक्तीला मंजुरी दिली जात होती.

4. माध्यमिक शिक्षकांच्या बोगस नियुक्तीसाठी 30 ते 40 लाख रुपये वसूल केले जात होते.

5. नियुक्तीआधीच रोख स्वरुपात रक्कम घेतली जात होती.

शिक्षक घोटाळ्याची ऑडिओ क्लिप आली समोर!

शिक्षक घोटाळ्याची ऑडिओ क्लिप आली समोर आली आहे. ही ऑडिओ क्लिप मुख्य आरोपी निलेश मेश्राम याची असल्याचा दावा केला जात आहे.

ऑडीओ क्लीपमधील संभाषण

या ऑडीओ क्लिपमध्ये एक व्यक्ती निलेश मेश्राम याला फोन करत असल्याचे समोर आले आहे.

व्यक्ती : "निलेश भाऊ बोल."
निलेश : "काल तुला फोन केला होता?"
व्यक्ती : "मी दोन दिवस बाहेर होतो"
निलेश : "नागपूरला कधी येणार, येऊन जा नागपूरला मला तुझ्याशी बोलायचं आहे. आपल्याला एक-दोन विषयांवर बोलायचं आहे. ते फाईल दाखवून दे, फाईल, ते पाठवायचं राहील, त्याला विचारलं तर तो म्हणे काही आलंच नाही इकडे. फाईल तुझ्याकडे आहे का, मला वाटलं पाठवून दिली, आता माझ्याकडे पैसे नाही, बघतो आज दिवसभरात"
व्यक्ती : "फाईल पाठवली नाही, मी आल्याशिवाय फाईल कशी येणार. आपल्याला जेवढं लेट होईल तेवढं चांगलं, मला अर्जंट 10 हजार रुपये हवे. मी एक नंबर देतोय, पाठव"

डिस्क्लेमर : वनइंडिया सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपची आणि त्यातील आवाज आणि संभाषणाची खात्री करत नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+