Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नागपूर दंगल अपडेट : 11 अल्पवयीन मुलांसह 80 आरोपी ताब्यात; आयुक्तांनी दिली धक्कादायक माहिती

औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मुद्यावर सध्या महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे. दुसरीकडे याच प्रकरणात सोमवारी नागपूरमध्ये दोन गटांत झालेल्या दंगलीने महाराष्ट्र हादरला होता. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी आंदोलन केल्यानंतर घटलेला हा प्रकार पूर्वनियोजित होता, असा आरोप केला गेला. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. तब्बल सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी या प्रकरणात धक्कादायक माहिती दिली. या प्रकरणात ११ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Nagpur riots update

काय म्हणाले पोलिस आयुक्त

नागपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आज पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते म्हणाले की, दंगलीनंतर नागपूरचा आढावा घेतला. त्यानंतर कपिलवन व नंदनगड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदी हटविण्यात आली. तसेच लकडगंज, शांतीनगर, इमामवाडा येथील संचारबंदी दोन तासांसाठी शिथील करण्यात आली. या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून ही संचारबंदी शिशिल करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.

येथे संचारबंदी कायम

पोलिस आयुक्त म्हणाले की, झोन तीनमधील कोतवाली, तहसील आणि गणेशपेठ या तीन पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या अनेक भागांत अद्यापही संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. यातील मुख्य संशयीत आरोपी फहीम खान दोन-तीन ठिकाणी दिसून आला आल्याचेही पोलिसांनी सांगितले. याच फहीम खानचा इतिहास तपासला जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

११ अल्पवयीन ताब्यात

आयुक्तांनी पुढे सांगितले की, या प्रकरणात आत्तापर्यंत ८० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात ११ अल्पवयीन मुलांचा सामावेश आहे. सर्व गोष्टींचा विचार करुन तपास सुरु आहे. यातील कोणत्याही दोषीला सोडण्यात येणार नाही, असंही आयुक्तांनी सांगितलं. मात्र या प्रकरणात अल्पवयीन मुलांचा समावेश आढल्याने एकच खळबळ उडाली आहे. दंगलीत गेल्या काही वर्षांपासून अल्पवयीन मुलांचा समावेश वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+