maharashtra weather update : नागपूरसह विदर्भावर अवकाळी पावसाचं संकट, पुढील दोन दिवस महत्वाचे
maharashtra weather update : मागील काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. महाराष्ट्रात अनेक भागात उष्णतेची लाट आहे. राज्यातील काही भागात ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. पुढील एक ते दोन दिवसात नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडेल, अशी शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
नागपूरसह संपूर्ण विदर्भात हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील दोन दिवसांत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाचा अलर्ट
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात येणाऱ्या अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील एक ते दोन दिवसांत मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता आहे. द्रोणिका आणि चक्रवाती वाऱ्यांमुळे बंगालच्या खाडीतून बाष्पयुक्त वारे विदर्भात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच नागपूरसह विदर्भातील काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह विजा चमकण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहू शकतो, ज्याची गती ताशी 40 ते 50 किलोमीटर इतकी राहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस विदर्भातील तापमान इतर दिवसांपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. रात्री उशिरा पावसाची शक्यता असल्याने दिवसाच्या तापमानावर विशेष परिणाम जाणवणार नाही. विदर्भातील काही भागात अजूनही उष्णतेची लाट सुरू आहे. राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेपासून आराम मिळू शकेल. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावरील सक्रिय कमी दाबाचे क्षेत्र संपलं आहे.
राजस्थानच्या पश्चिमेकडून विदर्भाच्या उत्तरेकडे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. यातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया देखील वाढली आहे. यामुळे राज्याच्या काही भागात हलका पाऊस पडत आहे. तसेच कोकणातील मुंबईसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील इतर अनेक भागांमध्ये लवकरच पावसाची हजेरी लागणार असल्याने नागरिकांना उकाड्यांपासून दिलासा मिळणार आहे.












Click it and Unblock the Notifications