नागपूरसह विदर्भात तापमान वाढले! अकोल्यात पारा 42 वर; गुढीपाडव्यानंतर पाऊस पडणार, जोरदार वारे वाहणार
Nagpur News Temperatures rise in Vidarbha : राज्यातील तापमान हळू हळू वाढत असतानाच नागपूर, अमरावती अकोलासह संपूर्ण विदर्भात उष्णतेत वाढ झाली आहे. अकोल्यात पारा 42 अंश सेल्सियसच्या वर पोहचला आहे. त्यातच आता 29, 30 मार्च रोजी मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
Maharashtra Temperature : आगामी चोवीस तासात तापमान आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हळूहळू तापमान वाढत असतानाच विदर्भात उष्णतेच्या झळ बसत आहेत. राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील परभणी, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव तर विदर्भातील बुलढाणा, अमरावती, ब्रम्हपुरी, चंद्रपूर, नागपूर अकोला येथे तापमान कमालीचे वाढत आहे.

राज्यात सर्वात जास्त तापमान कुठे सर्वात कमी कुठे?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली असून खासकरुन विदर्भ, मराठवाड्यातील तापमानात वाढ होत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात राज्यात सर्वात जास्त तापमान अकोला येथे ४२ अंश सेल्सियस तर सर्वात कमी अहिल्यानर येथे १८.९ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे.
३१ मार्च, १ आणि २ एप्रिलला पावसाची शक्यता
मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सोसाट्याचा वारा येत्या दोन दिवसात वाहणार आहे तर ३१ मार्च, १ आणि २ एप्रिलला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
ठळक घडामोडी
- एक वाऱ्याची द्रोणीय रेषा उत्तर मध्य महाराष्ट्र ते उत्तर केरळ पर्यंत (अंतर्गत कर्नाटक मार्गे) जात आहे.
- गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना झाली.
- मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण गोवा, मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते.
- विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
- राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
- मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.
- विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ घट आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.
गेल्या २४ तासांत प्रमुख शहरांतील कमाल,किमान तापमान (अंश सेल्सिअस)
मुंबई (कुलाबा) ३१.५/२४.८, सांताक्रूझ ३२.०/२३.०, अलिबाग ३१.१/२१.२. रत्नागिरी ३३.०/२५.१, पणजी (गोवा) ३३.५/२४.६, डहाणू ३३.३/२२.१, पुणे ३८.६/१९.५, लोहगाव ४१.४/२३.७, अहिल्यानगर ३८.२ /१९.३, जळगाव ४०.४/२३.६, कोल्हापूर ३५.९२२.९, महाबळेश्वर ३०.७/१८.९, मालेगाव ४०.०/२१.६, नाशिक ३७.७/१९.९, सांगली ३५.५/२०.६, सातारा ३७.७/२४.०, सोलापूर ३९.५/२५.२, धाराशिव ३८.०/२१.६, छत्रपती संभाजीनगर ३८.९/२१.२, परभणी ४०.०/२३.१, बीड ४०.१/२२.५, अकोला ४२.०/२२.५. अमरावती ४०.४/२१.४, बुलढाणा ३८.४/२४.४. ब्रह्मपुरी ४१.९/२०.५. चंद्रपूर ४१.२/-, गोंदिया ३८.८/१८.४. नागपूर ४०.०/२०.६, वाशिम, वर्धा ४०.०/२३.२, यवतमाळ /












Click it and Unblock the Notifications