Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

घरात शांतता अन् आला विचित्र आवाज नंतर उशी लागली थरथरायला, Video पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा

Nagpur Snake Viral Video : रात्री घरात सर्वत्र शांतता होती, घरातील लोक शांततेत जेवन खावन करून आपआपल्या बेडकडे निघाले. पण एका खोलीतील बेडवरील उशी अचानक हालायला लागली, तेव्हा तुम्ही शांत राहू शकाल का, तेव्हा नेमकं काय घडलं ते पाहून तुमच्या अंगाला काटा आल्याशिवाय राहणार नाही. नागपूरच्या महाजनवाडी परिसरातील एका घरात हे भयानक दृश्य समोर आलं. जिथे एका कुटुंबाची शांततेची रात्र मृत्यूच्या दाराकडे घेऊन जाणारी ठरली असती, त्याचे कारण होतं त्या उशीखाली असलेला एक विषारी नाग.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील जयस्वाल नगरमध्ये राहणाऱ्या पंकज कुवरे यांच्या कुटुंबासाठी ती एक सामान्य रात्र होती, पण बेडवर हालचाल जाणवताच त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. उशीखाली काहीतरी हालत होतं, सुरुवातीला त्यांना वाटलं उंदीर किंवा अन्य काही कीटक असेल. पण कंप वाढत असताना त्यांनी थरथरत्या हातांनी उशी उचलली आणि नंतर जे पाहिले ते संपूर्ण कुटुंबाला धक्का देणारे होते.

nagpur snake News

खिडकीतून आला विषारी नाग

बेडवर उशीखाली एक जिवंत नाग विश्रांतीसाठी शांततेत येऊन बसला होता. जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक, जो पाहून सर्वात धाडसी लोकही भान गमावतील. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. कोणताही विलंब न करता, त्या घरातील लोकांनी सर्पमित्राला बोलावले. ज्यांनी अतिशय काळजीपूर्वक नागाला पकडले आणि जंगलात सोडले.

असा धोका तुमच्या घरातही असू शकतो, घ्या काळजी

तज्ञांच्या मते, तुळस, मनी प्लांट आणि कडुलिंबाची मुळे यासारख्या काही वनस्पती सापांना आकर्षित करू शकतात, विशेषतः जेव्हा ओलावा असतो. जर तुमच्या घराभोवती जास्त झाडे आणि वनस्पती असतील तर काळजी घ्या. पावसाळ्यात घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा आणि मुलांना जमिनीवर झोपू देऊ नका.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+