Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Nagpur Violence : नागपूर हिंसाचारातील मास्टर माईंडची ओळख पटली, पोलिसांनी त्याचे नावच केले जाहीर

Nagpur Violence : नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. शहरातील महाल आणि लगतच्या परिसरात जाळपोळ आणि दगडफेक केल्याच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंसाचारातील मास्टर माईंडची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे. एफआयआरमध्ये त्यासंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरी विरोधात घोषणाबाजी केली. या प्रकारणी फहीम खान नमाक व्यक्तीने परिसरात जमाव जमावल्याचे स्पष्ट उल्लेख या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. एफआयआरनुसार फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचा शहर अध्यक्ष आहे. दरम्यान पोलिसांनी त्यास उचलल्याची देखील माहिती मिळत आहे.

Nagpur Violence

46 आरोपींना केले आतापर्यंत अटक

नागपुरातील हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 46 आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या दंगेखोरांना 21 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर नागपूर राड्याचा समांतर तपास नागपूर पोलिसांसह महाराष्ट्र एटीएस देखील करणार आहे. अशातच या हिंसाचारातील प्रकरणाचा मास्तर माईंड पोलिसांच्या हाती लागल्याने या प्रकरणाच्या तपासाला गती प्राप्त झाली आहे.

विधानसभा निवडणुकीत फहीम खानचा पराभव

फहीम खान 38 वर्षांचा असून त्याचं दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. फहीम खानने हिंसाचार करण्यासाठी प्रवृत्त करत होता. पोलीस हिंदु समाजाचे आहेत, आपली मदत ते करत नाही, असं सांगत फहीम खान आंदोलनकर्त्यांना भडकवत होता, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या विधानसभा निवडणूक फहीम खानने निवडणूक देखील लढवली होती. मात्र त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.

11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी कायम

नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 या भागातील 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गरज नसताना या भागातील लोकांनी घराबाहेर निघू नये, तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी जमू नये, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु असून लोक नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, अद्याप नागपूर शहरातील काही भागात तणावपूर्ण शांतता कायम असल्याचे दिसत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+