Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

देवेंद्र फडणवीसांचा नागपूर दंगलीबाबत मोठा निर्णय, आरोपींची प्रॉपर्टी विकली जाणार, नुकसान भरपाई...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात झालेल्या दंगलीचा आढावा घेतला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार असल्याचा देखील निश्चय केला. विशेषतः त्यांनी पैसे भरले नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकून त्याची भरपाई केली जाईल, अशाही सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूरच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून मी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. एकूण घटनाक्रम आणि त्यानंतर केलेली कारवाई या सगळ्या गोष्टींचा हा आढावा होता. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

Nagpur News

फडणवीस म्हणाले की, मुळातच काही गोष्टी मी सभागृहातही स्पष्ट केल्यात. त्यानुसार, औरंगजेबाची एक प्रतिकात्मक कबर सकाळी जाळण्यात आली. त्यानंतर काही लोकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पण त्यानंतर कबर जाळताना पवित्र कुराणमधील आयती लिहिलेली चादर जाळल्याची अफवा पसरली.

काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार केला. त्यानंतर सायंकाळी जमाव जमला. या जमावाने तोडफोड केली, जाळपोळ केली, गाड्या फोडल्या. लोकांवर हल्ले केले. पोलिसांनी 4-5 तासांतच स्थिती नियंत्रणात आणली. त्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या असतील किंवा इतर प्रकारच्या प्रतिबंधात्मक ज्या गोष्टी करायची गरज होती त्या सर्व गोष्टींचा वापर पोलिसांनी केला.

104 जणांची ओळख, 92 लोक अटक

या घटनेचे जेवढे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होते. त्याच्यासह खासगी लोकांनी आपल्या मोबाईलमध्ये केलेले चित्रिकरण व पत्रकारांच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 104 लोकांची आतापर्यंत ओळख पटली आहे. त्यापैकी 92 जणांना अटक करण्यात आली आहे. 12 जण 18 वर्षांखालील असल्यामुळे त्यांच्यावर संबंधित कायद्यान्वये कारवाई करण्यात आलली आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वादग्रस्त पोस्ट करणारेही सहआरोपी होतील

मुख्यमंत्री म्हणाले, एखादा व्यक्ती दंगल करताना दिसतो, दंगेखोरांना मदत करताना दिसतो, त्या सर्वांवर पोलिस कारवाई करतील. यात कुणालाही सोडले जाणार नाही. विशेषतः सोशल मीडियाचे मोठ्या प्रमाणात ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा तिचा प्रसार व्हावा म्हणून पोस्ट केल्या, त्या सर्वांना दंगेखोरांसोबतच सहआरोपी केले जाणार आहे. अशा प्रकारे ज्या लोकांनी दंगल भडकवण्यासाठी पॉडकास्ट केले, ज्यांनी चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून लोकांमध्ये एक पॅनिक तयार केली. अशा सर्व लोकांवर कारवाई केली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार

फडणवीस म्हणाले की, ज्या लोकांचे नुकसान झाले, काहींच्या गाड्या फुटल्या, काहींच्या अंशतः फुटल्या, त्या सर्वांना येत्या 3-4 दिवसांत नुकसान भरपाई दिली जाईल. आत्ता जे काही निर्बंध घातले आहेत, त्या निर्बंधांमुळे जनजीवन व व्यापारावर परिणाम होत आहे. पण त्याचवेळी पोलिस सजग राहणार आहेत. कुणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला, तरी देखील अतिशय कडक कारवाई केली जाईल. आत्ता जे काही नुकसान झाले आहे, ते सर्व नुकसान दंगेखोरांकडून वसूल केली जाईल. त्याची सगळी किंमत काढली जाईल. ती दंगेखोरांकडून वसूल केली जाईल आणि दंगेखोरांनी ते पैसे भरले नाही तर त्यांची प्रॉपर्टी विकून पैसे वसूल केले जातील.

दंगेखोरांना सरळ करणार

नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. नागपूरचा एक शांततेचा इतिहास आहे. 1992 नंतर नागपूरमध्ये केव्हाही अशा प्रकारची मोठी घटना घडली नाही. छोटे-मोठे वाद किंवा घटना घडल्या असतील. त्यामुळे आता दंगेखोरांना सरळ केले नाही, तर त्यांना अशी सवय लागेल. त्यामुळे या प्रकरणात कोणतीही सहिष्णूता बाळगली जाणार नाही, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+