Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

12वी परीक्षेला पेपरफुटीचे ग्रहण! केमिस्ट्रीचा पेपर आधीच WhatsAppवर व्हायरल; क्लास शिक्षकाचे कनेक्शन?

Nagpur HSC paper leak : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातून शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बारावीच्या बोर्ड परीक्षेची कडक सुरक्षा आणि बोर्डाचे सर्व दावे फोल ठरवत विज्ञान शाखेचा 'केमिस्ट्री' (रसायनशास्त्र) विषयाचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, 'फिजिक्स'चा पेपरही अशाच प्रकारे लीक झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या प्रकरणामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Nagpur HSC paper leak

स्वच्छतागृहातील 'त्या' १५ मिनिटांनी फुटले बंड

हा सर्व प्रकार नागपूरच्या सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर उघडकीस आला. दुपारी १२ च्या सुमारास परीक्षा सुरू असताना एक विद्यार्थिनी स्वच्छतागृहात गेली होती. मात्र, १५ मिनिटे उलटूनही ती बाहेर न आल्याने सतर्क पर्यवेक्षकांना संशय आला. महिला कर्मचाऱ्यांनी तिची झडती घेतली असता, तिच्याकडे चक्क मोबाईल सापडला.

मोबाईलमधील व्हॉट्सॲप तपासले असता धक्कादायक वास्तव समोर आले. 'XII' नावाच्या एका ग्रुपवर सकाळी १० वाजून ३७ मिनिटांनी, म्हणजेच परीक्षा सुरू होण्यापूर्वीच केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका अपलोड करण्यात आली होती.

या विद्यार्थिनीच्या माहितीवरून दुसऱ्या एका विद्यार्थिनीकडेही मोबाईल सापडला असून, या दोघीही एकाच व्हॉट्सॲप ग्रुपच्या सदस्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खासगी शिक्षकाचा मास्टरमाइंड? २१ विद्यार्थी पोलिसांच्या रडारवर

या पेपरफुटीचे धागेदोरे एका खासगी शिकवणी वर्गापर्यंत (Private Coaching) पोहोचले आहेत. ताब्यात घेतलेल्या विद्यार्थिनींनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका खासगी शिक्षकाने मोठ्या रक्कमेच्या बदल्यात हा पेपर उपलब्ध करून दिला होता.

व्हॉट्सॲप ग्रुपचे जाळे : ज्या ग्रुपवर पेपर लीक झाला, त्यामध्ये एकूण २१ विद्यार्थी आहेत.

तपासाची व्याप्ती : हे २१ विद्यार्थी शहरातील वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा देत आहेत. सायबर सेल आता या सर्व विद्यार्थ्यांची आणि त्या ग्रुपच्या ॲडमिनची चौकशी करत आहे. यात मोठी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा पोलिसांना दाट संशय आहे.

प्रशासनाचा दणका : संपूर्ण केंद्रावरील कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत.

१. कर्मचारी बदलले: सेंट उर्सुला केंद्रावरील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची तातडीने दुसऱ्या केंद्रावर बदली करण्यात आली असून, तिथे नवीन पथक तैनात करण्यात आले आहे.

२. गुन्हा दाखल : सदर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

३. मंत्र्यांचे आदेश: शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असून, दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+