नागपुरात महायुतीत बंडखोरी होणार; अजित पवारांचे देखील ऐकणार नाही, NCPच्या आभा पांडेंचा इशारा
Nagpur East Assembly Constituency, NCP Against BJP : आगामी एक ते दीड महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला प्रारंभ होणार आहे. त्याअनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांकडून तयार केली जात आहे. तर दुसरीकडे प्रत्येक मतदार संघातून इच्छुकांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच तिकीट वाटप होताना जर कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही तर मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार असल्याचे चित्र सद्या महाराष्ट्रात आहे. असाच काहीसा प्रकार नागपूर शहरातील एका मतदारसंघात होणार असून महायुतीतीच दोन नेते आमने सामने येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नागपुरात भाजपच्या सर्वात सुरक्षित मतदारसंघावर अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आभा पांडे यांनी निवडणूक लढवण्यासाठी चंग बांधला आहे. आता अजितदादांनी थांबवलं, तरी देखील आपण भाजप आमदाराविरोधात निवडणूक असल्याचा त्यांनी निर्धार केला आहे. त्यामुळे त्यांनी भाजपविरोधात निवडणूक लढवण्यासाठी दंड थोपटले आहे. तर या मतदारसंघात महायुतीतच बंडखोरी होणार हे निश्चित झाले आहे.

नागपूर पूर्व विधानसभेत होणार वाद
नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून मी कृष्णा खोपडे यांच्या विरोधात निवडणूक लढवावी ही इथल्या स्थानिक जनतेची मागणी आहे. मी जनतेच्या विरोधात जाऊ शकत नाही असे सांगत आभा पांडे यांनी नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. अगदी अजित पवार यांनी थांबवले तरी आता माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असेही आभा पांडे यांनी जाहीर केल्यामुळे भाजपच्या मतदारसंघात त्या बंडखोरी करणारच हे जवळपास निश्चित झाले आहे. कृष्णा खोपडे यांनी गेले 15 वर्ष या मतदारसंघात काहीही केलेले नाही. त्यामुळेच जनतेच्या इच्छेनुसार निवडणूक लढवण्याचे ठरविल्याचे आभा पांडे म्हणाल्या आहेत.
जनतेने केलेल्या आग्रहामुळे मी या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे, भाजप या जागेवरील दावा सोडो अथवा न सोडो मी या निवडणुकील उभी राहणार आहे, मतदारसंघात गेल्या 6 महिन्यांपासून मी तयारी सुरू केली आहे, गेली 15 वर्ष आमदार असलेल्यांनी काय विकास केला. तीन तास पाऊस पडला की, नागपुरात पाणीच पाणी होते. कचऱ्याचाही मोठा प्रश्न उद्भवलेला आहे.
तर मी अजित पवारांचेही ऐकणार नाही
मी या निवडणुकीला उभं राहणार असल्याचं अजित पवारांच्या कानावर घातलं असल्याचं देखील आभा पांडे यांनी म्हटलं आहे, जर पक्ष बैठकीत ही जागा भाजपला गेली, अजित पवार ही जागा माझ्यासाठी आणू शकले नाहीत, तरी देखील मी या निवडणुकीला उभं राहणार आहे, असं आभा पांडे यांनी सांगितलं आहे.












Click it and Unblock the Notifications