उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे, देवेंद्र फडणवीसांकडून उत्तर
dcm devendra fadnavis On Uddhav Thackeray : आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. आज पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. ठाकरे यांनी भाजपावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे .
आता लढाई मैदानात आहे, दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या सभेत बोललो की, एक तर तू राहशील किंवा मी राहील. माझ्या पायाशी कलिंगड ठेवलेलं होतं. त्यामुळे काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण? याची संकल्पना उद्धव ठाकरे यांनी सांगितली. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांचा डोक्यावरचा ताबा सुटला आहे- फडणवीस
उद्धव ठाकरे यांचा डोक्यावरचा ताबा सुटला आहे. ते प्रचंड फर्स्टेट झाले आहेत, त्यातूनच ते असं बोलत आहेत, त्या तणावामुळे ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहेत. याच्यावर आपण काय उत्तर देणार? एखादा व्यक्ती डोकं बिघडल्यासारखं बोलतो, त्यावर उत्तर द्यायचं नसतं. पण हे भाषण करुन अमित शाहांनी ज्या औरंगजेब फॅन क्लबचा उल्लेख केला होता, त्याच औरंगजेब फॅन क्लबचे उद्धव ठाकरे आहेत, हे त्यांनी दाखवून दिलं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.ते नागपुरात माध्यमांशी बोलत असताना ही प्रतिक्रिया दिली.

जे काही समोर येतं आहे, त्यासंदर्भात आम्ही योग्य चौकशी करु
माध्यमांच्या प्रतिनिधींनी देवेंद्र फडणवीसांना सचिन वाझे यांच्या आरोपाबद्दल विचारणा आलं. त्यावर ते म्हणाले, सचिन वाझेंनी जर मला पत्र पाठवलं असेल तर मी ते अद्याप पाहिलेलं नाही. मी पण माध्यमांद्वारे ही बातमी पाहिलेली आहे. मी नागपुरात आहे. त्यामुळे मला याबद्दल काहीही कल्पना नाही. त्यामुळे मी याबद्दल काही पत्र आलं आहे का, त्यात काय लिहिलं आहे, हे पाहून मी त्याबद्दल प्रतिक्रिया देईन. पण जे काही समोर येत आहे, त्याबद्दल योग्य चौकशी आम्ही करु, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे












Click it and Unblock the Notifications