Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

प्लॅनिंग करून बाहेरच्या लोकांनी नागपूरातील महाल परिसरात जाळपोळ केली; भाजपच्या 'या' आमदाराचा दावा

Nagpur BJP MLA Praveen Datke on Nagpur violence : नागपूर शहरात सोमवारी दुपारी विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर सायंकाळी महाल परिसरात दोन गटात तुफान राडा झाला. दगडफेकीसह जाळपोळीची घटना घडली असून नागपुरात सध्या तणावाचे वातावरण आहे.

पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. दरम्यान, या घटनेवर आता भाजपचे नागपुरातील आमदार प्रवीण दटके यांनी मोठा गौफ्यस्फोट केला आहे.

बाहेरून आलेल्या लोकांनी दगल घडवल्याचा आरोप

दरम्यान, बाहेरून आलेल्या लोकांनी ही दंगल घडवल्याचा आरोप नागपूर मध्यचे आमदार प्रवीण दटके यांनी केला आहे. तर मंत्रिमंडळातील मंत्र्याच्या वक्तव्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

प्रविण दटके म्हणाले की, बाहेरुन येणाऱ्या नागरिकांनी दगडफेक केली आहे. गाड्या पेटवल्या आहेत. अग्निशमन दल आग विझविण्यासाठी आले असता त्यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली अशी माझी माहिती आहे. माझ्याकडे 150 च्यावर व्हिडिओ आहेत, असा दावा प्रवीण दटके यांनी केला आहे.

Nagpur BJP MLA Praveen Datke on Nagpur violence

प्रवीण दटके म्हणाले की, महाल परिसरात बाहेरून येणाऱ्या लोकांनी ज्या सामान्य लोकांची घरे पेटवली. त्यामध्ये दुरुपकर परिवार, पेशणे परिवार, घाटेंचे परिवार, शिर्केंचे परिवार आहेत. टिपून टिपून त्यांनी घरांवर दगडफेक केली आहे, अशी माहिती आहे.

सकाळी आंदोलन, सायंकाळी ठरवून हल्ला

सकाळचे आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी भूमिका निभावली होती. परंतु, बाहेरील वस्त्यांमधील लोकांनी येऊन महाल परिसरात, बडकस चौक परिसरात सामान्य नागरिकांना त्रास देणे, अशी विदारक स्थिती आहे.

प्लॅनिंग करून हा हल्ला झाल्याचा केला दटकेंना दावा

सकाळी परिस्थिती वेगळी होती. पण नंतर प्लॅनिंग करून बाहेरचे लोक येऊन ही दगडफेक आणि जाळपोळ केली आहे. वस्त्यांमधील लोकांनी ती केली नाही, असे दोन्ही गटाच्या लोकांचे म्हणणे आहे. आता दोन्ही बाजुंचे लोक गल्लीच्या तोंडावर उभे असून दंगलखोर लोकांना पोलिसांच्या हवाली करत आहेत, असे आमदार प्रवीण दटके यांनी सांगितले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+