महाविकास आघाडीला मिळणार 160 ते 165 जागा! 'या' नेत्याने आकडाच सांगून टाकला, भाजपवर केली टीका
MVA will get 160 to 165 seats Sanjay Raut's statement : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळणार याचा आकडाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सांगून टाकला आहे. महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
सर्व्हेद्वारे भाजप भ्रम निर्माण करत आहे
संजय राऊत म्हणाले, लोकसभेला सर्व्हे आले होते, त्यात मविआला 10 जागा मिळणार नाही म्हटले होते पण आम्ही 31 जागा जिंकल्या. नरेंद्र मोदी चारशे पार असाही सर्व्हे होता पण बहुमत मिळाले नाही. महायुतीचे लोक कुठूनही सर्व्हे करुन घेतील आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतील हे सांगता येत नाही. महाराष्ट्राची जनता जागरुक आणि सावध आहेत.

संजय राऊत म्हणाले, आम्हाला 160 ते 165 जागा मिळणार आहे. आमचे सर्व प्रयत्न सुरु आहेत. चोऱ्या माऱ्या करुन ज्या जागा जिंकण्याचा प्रयत्न भाजप करत आहे तिथे आम्ही सावध राहायला सांगितले आहे. पैशांचे वाटप, इव्हीएम बॅटरी असे अनेक विषय आहेत. त्यामुळे आम्ही सावध आहोत कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात आता जे चंद्रचुड कृपेने किंवा मोदी शहांच्या कृपेने जे सरकार आहे, ते पुन्हा निवडून येणार नाही याची आम्हाला खात्री आहे.
एवढे प्रेम होते तर शिवसेना का फोडली?
संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदींची इच्छा काय आहे. बाळासाहेब ठाकरेंवर जर आपले एवढे प्रेम होते तर तु्म्ही अशा पद्धतीने गैरमार्गाने त्यांनी शिवसेना फोडली नसती विकत घेतली नसती. अमित शहांचे मनावर घेऊ नका , बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेतल्याशिवाय यांचा पक्ष महाराष्ट्रात एक इंचही पुढे सरकत नाही. त्याच बाळासाहेबांचा पक्ष त्यांनी फोडला. मग त्यांच्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक अधिक चांगले आहेत. त्यांचे बाळासाहेबांवर प्रेम आहे, भाजपसारखे पाठीत खंजीर खुपसणारे प्रेम नाही.
भाजप वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाही
संजय राऊत म्हणाले, वीर सावरकरांचा विषय हा नसती उठाठेव भाजपने करु नये. आम्ही सातत्याने सांगतो की, वीर सावरकरांना भारतरत्न द्या पण आपण का देत नाही? आम्ही गेली दहा वर्ष आमचा घसा कोरडा करतो आहोत त्यांना भारतरत्न देणे हे अमित शहांच्या हातात आहे, जर ते ३७० कलम हटवून पाठ थोपवून घेऊ शकता तर मग भारतरत्न देऊ शकता. अमित शहांनी भाजपच्या पोस्टरवरचा बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढा लोक तुम्हाला महाराष्ट्रात उभे करणार नाही.












Click it and Unblock the Notifications