Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुणे मेट्रोवरुन मविआ कार्यकर्ते आक्रमक, लोकापर्णाआधीच लाल फित लावून उद्घाटन करण्याचा प्रयत्न

Pune Metro Issue, PM Narendra Modi : पुण्यात मागील चार दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी पुणे मेट्रोच्या भुयारी प्रकल्पाचे उद्घाटन व एसपी कॉलेजच्या मैदानावर होणारी सभा रद्द करण्यात आली होती.

त्यामुळे आता मेट्रोचे उद्घाटन कधी होणार असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला होता. पण आता मेट्रोच्या उद्घाटनाची नवी तारीख जाहीर झाली आहे. मात्र त्या आधीच मविआचे नेते संतप्त झाले आहेत, त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे, तर लाल फित कापत त्यांनी लोकार्पण केलं असून आजच आम्ही मेट्रोने प्रवास करणार म्हणत आक्रमक झाले आहेत.

PM Narendra Modi  MVA  Pune Metro

मविआचे कार्यकर्ते झाले आक्रमक

नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळमुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म एक्स वर पोस्टमध्ये लिहिले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते (व्हर्चुअली) शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे लोकार्पण आणि स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचे भूमिपूजन येत्या रविवारी, दि. 29 सप्टेंबर, 2024 रोजी होणार आहे." पण त्याआधीच महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून काॅंग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पुण्यातील सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांना अडवण्यासाठी पोलीस बळाचा वापर करावा लागला.

पुणेकरांना वेठीस धरण्याचा अधिकार कोणी दिला

रविंद्र धंगेकर माध्यामाशी बोलताना म्हणाले की, पंतप्रधान दोन दिवसांनी केबिनमध्ये उद्घाटन करणार आहेत मग आता का नाही करत? पुणेकरांना वेठीस धरण्याचा अधिकार यांना कोणी दिला? "टप्याटप्याने असं उद्घाटन होतं असतं का? पंतप्रधान मोदी 2016, 2018, 2022, 2023 ला उद्घाटनासाठी आले. महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे असा आरोपही धंगेकर यांनी केला. लोकशाहीने आम्हाला जो अधिकार दिलाय, त्यात पुणेकरांची बाजू मांडत आहोत, जर कालच्या सारखं पुन्हा झालं, मग चार दिवस उद्घाटन पुढे जाणार का? असा सवालही धंगेकरांनी केला आहे.

आज जोवर मेट्रो सुरु होणार नाही तोवर आम्ही इकडून हलणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. पोलिस महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची समजूत काढत आहेत. पण कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+