Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आता लवकरच महापालिका निवडणुकीचं वारं वाहणार! नव्या सरकारच्या स्थापनेनंतर लवकरच मोठा निर्णय

Municipal corporation election : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर यात महायुतीला मोठे यश मिळाले आता गेल्या अनेक काळापासून रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. बहुतांश ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत, आता या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत.

महायुतीने महाविकास आघाडीला भुईसपाट करत दिमाखदार विजय प्राप्त केला आहे. राज्यातील जनतेने महायुतीच्या पारड्यात भरघोस यश दिले आहे,महायुतीतील तिन्ही पक्षांनी एखत्रितपणे 230 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 50 जागांचाही आकडा गाठतानाच नाकीनऊ आले आहे.

Municipal corporation

धक्कादायक निकाल

23 नोव्हेंबरला राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले. यामध्ये बरेच धक्कादायक निकाल लागले आहेत. महायुतीला मिळालेल्या जागा सर्वांसाठीच अनपेक्षित धक्का आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबीला अनपेक्षित असे म्हटले आहे. दरम्यान, भरभरुन लोकांनी महायुतीला मतदान केले. त्यामुळे महायुती सरकारचा शपथविधीनंतर अशा स्थितीत निवडणुका घेतल्या जाऊ शकतात.

मुंबई ते छत्रपती संभाजीनगर अनेक निवडणुका रखडल्या

महत्वाची बाब म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकांमार्फत काम केले जात आहे. मुंबई महापालिका असो की छत्रपती संभाजीनगर महापालिका किंवा राज्यातील अशा बहुतांश महापालिका-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरसह इतर ठिकाणी तर साडेचार ते पाच वर्ष उलटून गेली पण निवडणुका झाल्या नाहीत. येथील लोकांना निवडणुका कधी होतील याची प्रतिक्षा आहे.

महाविकास आघाडीचे नेते वारंवार निवडणुका जाहीर करा असे म्हणत होते व महायुतीवर आरोपही करत होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास प्रतिकूल असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यात लवकरच राज्यात लवकरच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहतील अर्थात निवडणुका जाहीर होतील ही शक्यता आहे. विधानसभेच्या एतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत सकारात्मक भूमिका आहे.

विधानसभा निवडणुकीत कोणाला किती जागा?

  • भाजप - 132
  • शिवसेना (शिंदे गट)- 57
  • राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
  • काँग्रेस- 16
  • राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
  • शिवसेना (ठाकरे गट)- 20
  • समाजवादी पार्टी- 2
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+