मुंबईत महिलेला बीएमडब्ल्यू कारने चिरडणारा 'तो' आरोपी दारुडा! अहवालातील मोठा दावा

मुंबई - मुंबईतील वरळी हिट अँड रन प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आला आहे. बीएमडब्ल्यू कारने चिरडून महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांकडून अटक करण्यात आलेला आरोपी अट्टल दारुडा असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिस तपास करीत आहेत. या आरोपींच्या चौकशीतून मोठा दावा करण्यात आला आहे.

पहाटे झाला होता अपघात

पोलिस सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की, मुंबई बीएमडब्ल्यू अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याने चौकशीदरम्यान एका मोठ्या आरोपाची कबुली दिली आहे.

Mumbai hit and run case  Mihir Shah

हीट अँड रनची घटना मुंबईतील जुहू येथे घडली होती. 6 जुलै रोजी कावेरी नाखवा या 45 वर्षीय महिलेला बीएमडब्ल्यू कारने धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने महिलेचा मृत्यू झाला.

चौकशीत दिली कबुली

कावेरी नाखवा यांना दोन मुलं आहेत. अपघाताच्या वेळी त्या जुहू येथे पती प्रदीप नाखवासोबत मासे खरेदी करण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. या प्रकरणाशी संबंधित एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, पोलिसांच्या चौकशीत मिहीर शहा मद्यपी असल्याची कबुली दिली आहे. अपघाताच्या वेळी मिहिर शहा जुहू येथील एका बारमधून परतत होते. पहाटे साडेपाच वाजता बीएमडब्ल्यू कारने दुचाकीस्वार नाखवा दाम्पत्याला धडक दिली.

आरोपी 'या' पक्षाच्या नेत्याचा मुलगा

आरोपी मिहीर शहा हा शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा असून त्याने घटनेनंतर तीन दिवस पोलिसांपासून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मिहीर पोलिसांपासून सुटू शकला नाही आणि पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस करून त्याला अटक केली.घटनास्थळी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून समोर आले आहे की, धडक झाल्यानंतर कार थांबण्यापूर्वी कावेरी नखवासला 1.5 किलोमीटरपर्यंत फरफटत नेण्यात आले होते.

मिहीरला न्यायालयीन कोठडी

या प्रकरणी मिहीरला पळून जाण्यात मदत केल्याच्या आरोपाखाली त्याचे वडील राजेश शहा यांना अटक झाली होती, त्यानंतर त्यांना जामिन मिळाला. दरम्यान आज हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याला मुंबई न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी मिहिरला सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात आले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+