वरळी हिट अँड रन : शिवसेनेचा उपनेता ताब्यात, कारमधील मुलगा चालक पसार
मुंबई : मुंबईच्या वरळी भागात आज झालेल्या हिट अँड रन अपघातात महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे पालघरमधील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अपघात (Accident Updates) झाला त्यावेळी राजेश शहा गाडीत नव्हते. मात्र, त्यावेळी त्यांचा मुलगा आणि चालक कारमध्ये होते.

एका भरधाव कारने आज सकाळी साडेपाचच्या सुमारास वरळीतील मासे बाजारात लिलावासाठी जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला. कारच्या बोनटवर असलेल्या महिलेला फरफटत नेल्यानंतर गंभीर जखमी महिला ठार झाली. या दुर्घटनेनंतर कारसह चालकाने पलायन केले होते. दरम्यान, पोलिसांनी कारचालकाचा शोध घेतला.हिट अँड रन प्रकरणातील कार पांढऱ्या रंगाची बीएमडब्ल्यू होती. या कारमध्ये शिवसेना शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आणि ड्रायव्हर होते.
कारवर पक्षाचे चिन्ह,खोडण्याचा प्रयत्न केला
अपघातानंतर कारमधील मुलगा आणी चालक अद्यापही पसार आहेत. पोलिसांकडून आरोपी मुलगा आणि ड्रायव्हर दोघांचाही कसून शोध घेत आहेत. दरम्यान,या प्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अपघातग्रस्त पांढऱ्या रंगाची बीएमडब्ल्यू काप पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यावर एका पक्षाचं चिन्ह असून अपघातानंतर ते चिन्ह खोडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी गाडीसोबतच संशयिताला ताब्यात घेतले आहे.
असा घडला अपघात
मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली.मॉलजवळच कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा हे कोळी दाम्पत्य आज सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला जात होते. त्यानंतप दाम्पत्याच्या दुचाकीला कार धडकली. या अपघातात दाम्पत्य कारच्या बोनटवर पडले पण पतीने प्रसंगावधान राखत जीव वाचवला. पण कारने महिलेला फरफटत नेते यातच महिला ठार झाली.












Click it and Unblock the Notifications