पुण्यासारखेच वरळीतही 'हिट अँड रन'! महिला ठार

मुंबई : पुण्यात पोर्शे कारने चिरडल्याची घटना ताजी असतानाच आता मुंबईच्या वरळीतही 'हिट अँड रन'ची थरारक घटना घडली आहे. येथील प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ ही घटना आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या अपघातात गाडीने चिरडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

Accident

वरळीमध्ये मासळी बाजारातून मासे आणण्यासाठी एक कोळी दाम्पत्य आज पहाटे गेले होते. पहाटे साडेपाचची वेळ होती. वरळीतील प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ या महिलेला गाडीने चिरडले. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला घरुन निघाले. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडी धडकली. त्यामुळे महिलेच्या पतीचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले यात दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले.मात्र पतीने बोनेटवरुन बाजूला उडी टाकल्याने तो वाचला.

..अन् महिला ठार

या दुर्घटनेत बोनेटवर पडलेल्या महिलेला स्वतःला सावरता आले नाही, त्यामुळे ती तेथेच पडलेली होती. आपल्या हातून अपघात घडल्याने चारचाकी गाडीचा चालक प्रचंड घाबरला. त्यामुळे त्याने तशीच गाडी पळवली. यामध्ये बोनेटवर असलेली महिला कोसळली व गाडीने महिलेला फरफटत नेले. त्यानंतर चालक गाडीसह पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या महिलेला लगेचच मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर पोलिसांकडून संशयित गाडी चालकाचा कसून शोध सुरू आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+