केस, दाढी कापून मिहीरचा ओळख लपवायचा प्रयत्न! अपघातानंतर प्रेयसीला केले 40 कॉल

मुंबई - वरळी हिट अँड रन प्रकरणी शिवसेनेतून पदमुक्त केलेले उपनेते राजेश शहा यांचा सुपूत्र मिहीर शहा याला अटक करण्यात आली आहे. दोन दिवस त्याने पोलिसांना गुंगारा दिला होता. विशेष म्हणजे अपघातानंतर त्याने केस आणि दाढी कापून ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय त्याने आपल्या प्रेयसीला अपघातानंतर तब्बल 40 काॅल केल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासातून समोर आली आहे.

महिला चिरडली तरीही कार पळवली

वरळीत सात जुलैला महीर शहा याच्या अलिशान बीएमडब्ल्यू कावेरी नाखवा या महिलेला चिरडले होते. पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, बिंदू माधव ठाकरे चौक ओलांडल्यानंतर इतर चालकांनी मिहीर शाह यांना कार थांबवण्यास सांगितले, परंतु त्यांनी त्यांचे ऐकले नाही.

mihir shaha worali hit and run case

पोलिसांचा दावा आहे की, मिहीरला माहित होते की, ती महिला टायरमध्ये अडकली, तरीही त्याने गाडी चालवणे सुरूच ठेवले होते. त्यानंतर मिहीर शहाने दोन दिवस पोलिसांना गुंगारा दिला.

मिहीरच्या शेजारी होता चालक

हिट अँड रनप्रकरणी मिहीरला मंगळवारी अटक झाली. त्यानंतर त्याला 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीने महिलेला आपल्या कारसह सुमारे दीड किलोमीटरपर्यंत खेचले होते. मिहीरचा ड्रायव्हरही गाडीत होता. तो ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसला होता. महीर शहाचा दावा आहे की त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे, पण परवाना अद्याप परत मिळालेला नाही.

मिहीरचे तपासात सहकार्य नाही

मिहीर शहा तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बार सोडल्यानंतर त्याने गाडी कुठून चालवायला सुरुवात केली आणि किती वेळ चालवली हेही सांगितले नाही. पोलिसांनी सांगितले की, मिहीरने अपघाताच्या वेळी कार चालवत असल्याची कबुली दिली आहे.

अपघातानंतर प्रेयसीला 40 कॉल

सूत्रांनी सांगितले की, अपघातानंतर मिहीरने सर्वप्रथम वडिलांना फोन केला. त्यानेच त्याला पळून जाण्यास सांगितले. यानंतर मिहीरने बीएमडब्ल्यू कार आणि चालकाला वांद्रे येथील कला नगरजवळ सोडले. पकडले जाऊ नये म्हणून त्याने गाडीची नंबर प्लेट काढून टाकली. कार सोडल्यानंतर तो रिक्षा घेऊन गोरेगाव येथील मैत्रिणीच्या घरी गेला. अपघातानंतर तो प्रेयसीच्या घरी पोहोचला तोपर्यंत मिहीरने त्याच्या प्रेयसीशी फोनवर 40 वेळा बोलला. महीर 2 तास प्रेयसीच्या घरी थांबला होता. यावेळी प्रेयसीने मिहीरच्या बहिणीला फोनवरून घटनेची माहिती दिली.

ओळख लपवण्यासाठी केस दाढी कापली

मिहीरची बहीण मिहीरच्या प्रेयसीच्या घरी आली आणि महीरला घेऊन बोरिवली येथील तिच्या घरी गेली. तेथून राजेश शहा यांची पत्नी मीना आणि दोन मुली (पूजा आणि किंजल) मिहीर शाह आणि त्याचा मित्र अवदीप यांच्यासोबत मुंबईपासून 70 किमी अंतरावर असलेल्या शाहपूर येथील एका रिसॉर्टला निघाले.

तत्पूर्वी अपघातानंतर पळून गेल्यानंतर मिहीर शाहने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी कापली. त्याला वेश बदलण्यात कोणी मदत केली का, याचा तपास पोलिस करत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+