वरळी'हिट अँड रन'नंतर मिहीर शहाच्या सुटकेचा प्लॅन कसा फसला? घ्या जाणून
मुंबई - मुंबईतील वरळी भागात रविवारी हिट अँड रनची घटना घडली. शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांच्या मुलाच्या बीएमडब्ल्यू कारने एका महिलेचा बळी घेतला. यानंतर मुलगा सुटावा म्हणून शहा यांनी प्लॅन केला पण तो मुंबई पोलिसांसमोर पुरता फेल झाला. तो कसा फसला चला जाणून घेऊया या रिपोर्टमधून..
वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहिर शहा याला त्याचे वडिल राजेश शहा यांनी पळून जाण्याचा सल्ला दिला होता. मिहिरला वाचवण्यासाठी त्यांनी व कुटुंबांनी मदत केल्याचेही प्राथमिक पोलिस चौकशीत समोर आले आहे.

मुलाला वाचवण्याचा प्रयत्न
अपघानंतर मुख्य आरोपी मिहिर शहा आणि चालक राजऋषी बिडालत दोघेही पळुन गेले. त्यांना पळुन जाण्याचे सांगितले होते.मिहीर शहाला वाचवण्यासाठी राजेश शहांनी चालकाला गुन्ह्याची जबाबदारी घ्यायला सांगितली होती असेही चौकशीत समोर आले आहे.
पळून जाणाऱ्या महीर शहाची कार वांद्रे कलानगर येथे बंद पडली. त्यानंतर त्यानंतर राजेश शहा घाईघाईने कलानगर येथे पोहचले.
कारवरील चिन्ह खोडले
राजेश शहा यांनी फोन करुन एक टोईंग वाहन बोलावून घेतले. यादरम्यान त्यांनी मिहीरच्या गाडीची ओळख कुणाला पटू नये म्हणून यासाठी नंबरप्लेट आणि शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह गाडीवरुन झटपट खोडून काढून टाकले.
..अन् मुंबई पोलिस कारजवळ पोहचले
राजेश शहा टोईंग वाहनाची वाट बघत असतानाच मुंबई पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यामातून कारजवळ पोहचले आणि राजेश शहा यांची सर्व योजना तेथेच फसली.
चालक घेणार होता अपघाताची जबाबदारी
राजेश शहा यांनी आखलेल्या योजनेनुसार, अपघाताची जबाबदारी घेण्यासाठी मिहीरसोबत असलेला चालक राजऋषी बिडावत तयार होता. तो वांद्रे येथेच थांबून राहीला होता.दरम्यान, पोलिसांनी बिडावत यालाही ताब्यात घेतले होते.
पार्टी केलेल्या त्या बारला दणका
मिहीर शहाने अपघातापुर्वी जुहूत ज्या बारमध्ये पार्टी केली होती तो वाईस ग्लोबल तापस हा बार सील करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी या बारवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. बारचा परवाना निलंबित करण्यात आले आहे.
असा घडला होता अपघात
रविवारी सकाळी एका भरधाव कारने वरळीतील मासे बाजारात लिलावासाठी जाणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली. या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. कारच्या बोनटवर असलेल्या महिलेला फरफटत नेल्यानंतर महिला ठार झाली होती.
या दुर्घटनेनंतर कारसह चालकाने पलायन केले होते. दरम्यान, पोलिसांनी कारचालकाचा शोध घेतला.हिट अँड रन प्रकरणातील कार पांढऱ्या रंगाची बीएमडब्ल्यू होती. या कारमध्ये शिवसेना शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आणि ड्रायव्हर होते.


Click it and Unblock the Notifications