Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या पीजी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Mumbai University PG admission schedule : मुंबई विद्यापीठात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई विद्यापीठाने यावर्षीच्या पदव्युत्तर शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेशाबाबतची माहिती व संपूर्ण वेळीपत्रक जाहीर केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विद्यापीठाने सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्न महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि एमयूच्या मान्यताप्राप्त संस्थांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश वेळापत्रक जाहीर केले आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) नुसार राबविण्यात येत आहे.

Mumbai University PG admission schedule

विद्यार्थी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट https://mu.ac.in/admission ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. प्रवेश नोंदणीपासून ते अर्ज सादर करण्यापर्यंतची प्रक्रिया समजून घेण्यासाठी वेबसाइटवर व्हिडिओ लिंक देखील देण्यात आलेली आहे.

एमयूने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वेळापत्रकात नमूद केलेल्या विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग 1 जुलैपासून सुरू होतील.

परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाच्या संचालिका पूजा रौदळे यांनी सर्व पदव्युत्तर शैक्षणिक विभाग, संलग्न महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांना या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन देखील केले आहे.

मुंबई विद्यापीठ पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

  • ऑनलाइन नोंदणी आणि प्रवेश अर्ज सादर करणे - 3 जून पर्यंत
  • विभाग किंवा संस्थांद्वारे कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी - 9 जून (सायंकाळी 6 वाजेपर्यंत)
  • तात्पुरती गुणवत्ता यादी - 10 जून (सायंकाळी 6 वाजेपर्यंत)
  • विद्यार्थ्यांची तक्रार - 12 जून (दुपारी 1 वाजेपर्यंत)
  • पहिली गुणवत्ता यादी - 17 जून (सायंकाळी 6 वाजेपर्यंत)
  • ऑनलाइन शुल्क भरणे - 18 ते 21 जून (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
  • दुसरी गुणवत्ता यादी - 24 जून (सायंकाळी 6 वाजेपर्यंत)
  • ऑनलाइन शुल्क भरणे - 25 जून ते 27 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
  • व्याख्यानांची/ प्रत्यक्ष शिकवणी वर्गाची सुरुवात - 1 जुलै.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+