Mumbai train accident : मुंबईत रेल्वे अपघात नेमका कसा झाला? अधिकाऱ्यांनी सांगितलं, 3 मुद्यात वाचा
Mumbai train accident : मुंबईमध्ये मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान लोकलमधून पडून पाच प्रवाशांचे जीव गेल्यानंतर रेल्वे बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. एकीकडे रेल्वे विभाग अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून काळजी घेत आहे तर दुसरीकडे आज 9 जून 2025 रोजी घडलेला अपघात नेमका कसा घडला याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास कसाऱ्याहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडून 5 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर जखमींमध्ये सात पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.

संग्रहित छायाचित्र.
पुष्पक एक्सप्रेसचा या अपघाताशी संबंध नाही
दरम्यान काही वृत्तवाहिनी दावा केला होता की मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन लखनऊला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमधील प्रवासी खाली पडले आणि काही माध्यमांनी पुष्पक एक्सप्रेस व कसारा येथून सीएसटीएम जाणाऱ्या लोकलचे प्रवासी एकमेकांना घासले गेले व ही घटना घडली असे म्हटले परंतु पुष्पक एक्सप्रेसचा या घटनेशी संबंध नसल्याचा रेल्वेने स्पष्ट केलं.
कसा झाला लोकलचा अपघात?
1. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, कसाऱ्यावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारे लोकल प्रवाशांनी गच्च भरली होती काही प्रवासी पायदानावर उभे राहून प्रवास करत होते.
2. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून डाऊन दिशेने जाणारी एक लोकल समोरून आली या ठिकाणी या दोन्ही लोकल गाड्या एकमेकांच्या बाजूने जात होत्या
3. या भागात दोन रेल्वे रुळांमध्ये अंतर कमी आहे तसेच अनेक प्रवासी दरवाजात उभे होते त्यांच्या पाठीवर बॅगा देखील होत्या,हे प्रवासी डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलला घासले गेले त्यांच्या बॅगा दुसर्या लोकल वर आदळल्या त्यामुळे दरवाज्यात उभे असलेले आठ प्रवासी खाली पडले.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्निल निला यांनी या घटनेनंतर पत्रकार परिषद घेतली. निला म्हणाले, आम्हाला त्या लोकांमध्ये प्रवाशांची व गार्डने सकाळी साडेनऊच्या समोरास फोन करून या घटनेची माहिती दिली त्यानंतर आम्ही तातडीने या प्रवाशांसाठी रुग्णवाहिका पाठवली. 9 वाजून 50 मिनिटांच्या दरम्यान रुग्णवाहिका व रेल्वेच्या अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व जखमींना रुग्णालयात नेले.
-
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा











Click it and Unblock the Notifications