Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबई रेल्वे अपघातातील 4 मृतांसह, 9 जखमींची नावे आली समोर! कशी आहे प्रकृती, सविस्तर माहिती वाचा

Mumbai train accident 4 dead 9 injured names revealed : मुंबईत कसाऱ्याहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडून सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चार प्रवाशांचा मृत्यू झाला तर नऊ प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सात पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.

लोकलच्या दरवाजाला लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या एक्स्प्रेसला घासले गेले. त्यातून हा भीषण अपघात झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व प्रवाशांची नावे त्यांना झालेली जखम आणि काय उपचार सुरु आहेत, याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे.

Mumbai train accident

ठाणे महानगरपालिका, ठाणे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा

  • रेल्वे अपघातातील एकूण दाखल रुग्ण - १० (८ पुरुष, २ महिला)
  • मृत - ०१ (पुरुष)
  • गंभीर जखमी - ०२ (पुरुष), (मेंदूशी निगडित तातडीची शस्त्रक्रिया आवश्यक असल्याने तत्काळ जुपिटर हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे.)
  • सात जणांची प्रकृती स्थिर असून यात पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
  • सर्व सातही रुग्ण स्थिर असून अतिदक्षता कक्ष येथे दाखल करण्यात येत आहे.) मृतांमध्ये एका अनोळखी पुरुष प्रवाशाचा समावेश आहे.

सरकारी सुत्रांनुसार, मृतांची संख्या चारवर

रेल्वे अपघातातील एकूण १३ प्रवाशांना दोन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन गंभीर जखमींना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या तिघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सकांकडून देण्यात आली. त्यामुळे मुंब्रा रेल्वे दुर्घटनेतील मृतांची संख्या ही चार झाली आहे.

मुंब्रा दुर्घटनेत आतापर्यंत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून नऊ प्रवासी जखमी झाल्याची माहिती ठाण्याचे नायब तहसिलदार यांनी दिली. तर ९ व्यक्तींना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा, येथे दाखल करण्यात आले आहे.

मृत्यू झालेल्या 4 प्रवाशांची माहिती

  • केतन दिलीप सरोज(२३ वर्ष, रा. तानाजी नगर, उल्हासनगर)
  • राहुल संतोष गुप्ता
  • विकी बाबासाहेब मुख्यदल(३४ वर्ष, रेल्वे पोलिस कर्मचारी)
  • एक अज्ञात व्यक्ती

जखमी प्रवाशांची माहिती

१) शिवा गवळी (२३ वर्ष) यांची प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.

२) आदेश भोईर (२६ वर्ष, रा. आढगाव, कसारा) यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

३) रिहान शेख (२६ वर्ष, रा. भिवंडी) यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत

४) अनिल मोरे (४० वर्ष) यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.

५) तुषार भगत (२२ वर्ष) यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

६) मनीष सरोज (२६ वर्ष, रा. दिवा साबेगाव, दिवा) यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

७) मच्छिंद्र गोतारणे (३९ वर्ष, रा. वाशिंद) यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

८) स्नेहा धोंडे (२१ वर्ष, रा. टिटवाळा) यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

९) प्रियंका भाटिया (२६ वर्ष, रा. शहाड, कल्याण) यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+