Mumbai News : मुंबईच्या टाइम्स टॉवरला लागलेली आग नियंत्रणात

मुंबई : मुंबईच्या लोअर परेल पश्चिम भागात असलेल्या टाइम्स टॉवर इमारतीला आग लागली. प्राथमिक माहितीनुसार अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी हजर असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगली बाब म्हणजे या आगीत अद्याप कोणीही जखमी झालेले नाही. कमला मिल कंपनी मधील टाईम्स टॉवर ही ग्राउंड प्लस सातमाळ्याची बिल्डिंग आहे.सकाळी 6.30 सुमारास आग लागल्याची माहिती आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे.

टाईम्स टॉवर मुंबईतील अतिशय वर्दळीच्या भागात आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी परिश्रमपूर्वक काम करत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याचं बीएमसीकडून सांगणयात आलं आहे. कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाचा जलद प्रतिसाद महत्त्वाचा ठरला आहे.

Times Tower building

आगीच कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीच्या धुरांचे लोट सातव्या मजल्यापर्यंत गेले आहेत. काचेची बिल्डिंग असल्याने आगीचा धूर आतमधील सर्व मजल्यांपर्यंत पोहोचला आहे. धूर बाहेर जाण्यासाठी बिल्डिंगच्या काचा फोडण्यात येत आहे. हा टॉवर व्यावसायिक असल्याने सध्या तरी आतमध्ये कोणीही अडकलं नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या इमारतीला आग लागल्यामुळे परिसरात भिंतीचे वातावरण आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+