Mumbai News : दुर्देवी घटना ! 20 व्या मजल्यावरील स्लॅब कोसळला अन् तिघांचा हकनाक बळी गेला

मुंबईतील मालाडमधील एका इमारतीचं काम सुरु असताना सहा मजूर खाली कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या मजुरांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मालाडमधील नवजीवन सोसायटीच्या निर्माणाधीन इमारतीच्या 20 व्या मजल्याचा स्लॅब दुपारी पाऊणच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. त्यांच्यावर एम डब्ल्यू देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या या घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे

Mumbai Slab collapse

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम मधील गोविंद नगर भागात अनेक इमारतींचे बांधकाम सुरु आहे. यातील बांधकाम सुरु असलेल्या नवजीवन इमारतीचा स्लॅब आज दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास कोसळला. ही इमारत झोपडपट्टी पुनर्वसनातंर्गत बांधली जात आहे. ही इमारत ग्राउंड + 20 अशा स्वरुपाची आहे. या इमारतीच्या 20 व्या मजल्याचे काम सुरु होते. या 20 व्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरु असताना अचानक हा स्लॅब कोसळला.

इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याने 6 कामगार जखमी झाले. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एका कामगारावर मालाडमधील देसाई रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून हा स्लॅब हटवला जात आहे. पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून ते या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+