Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबईत 500 रुपये रुम भाडे! बाथरूमपेक्षा लहान खोली, Zomato डिलिव्हरी बॉयने शेअर केला व्हिडीओ

Mumbai Room Rent: मुंबईला 'स्वप्नांचे शहर' म्हणूनही ओळखले जाते. मुंबईत जाऊन पैसे कमावयचे असं स्वप्न बहुतेकांचे असते. येथे सर्व स्तरातील लोक राहतात. मग ते 2 बीएचके असो किंवा झोपडपट्टी क्षेत्र. मुंबईच्या डिलिव्हरी बॉयने एक व्हिडिओ शेअर केला आहे . ज्याची खूप चर्चा होत आहे. त्याबद्दल जरा जाणून घेऊया.

या डिलिव्हरी बॉयने व्हिडिओ शेअर केला आहे

मुंबईतील एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने झोपडपट्टी भागात एका खोलीचे भाडे दिले आहे. हा डिलिव्हरी बॉय दुसरा कोणी नसून मूळचा ईशान्य भारतातील प्रंजॉय बोरगोयारी आहे. उदरनिर्वाहासाठी तो शहरात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्यासाठी घराबाहेर पडला. तो गायक आणि राज्यस्तरीय फुटबॉल खेळाडू म्हणूनही खेळला आहे. त्याचं आयुष्य कसं जगतोय त्याने हेही सांगितलं आहे.

zomato delivery boy

फक्त 500 रुपये देतो भाडे देतो

मुंबईतील झोपडपट्टीत राहणारा झोमॅटो डिलिव्हरी बॉय फक्त 500 रुपये भाडे देतो, त्याने एका व्हिडिओद्वारे माहिती दिली आहे की, तो फक्त 500 रुपये देऊन भाड्याच्या खोलीत राहतो. या खोलीत त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती राहतो. या खोलीतील जागा बाथरूमइतकी लहान आहे यावरूनही तुम्ही अंदाज लावू शकता.

राहण्या-खाण्यावर जास्त पैसे खर्च करू शकत नसल्याचेही या तरुणाने सांगितले आहे. यामुळे तो एका छोट्या खोलीत राहतो. याआधी त्याच्या घरातील अनेकांना आजारांनी घेरले होते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला खूप पैसे खर्च करावे लागले होते. या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे की, या झोपडपट्टीतील अतिशय अरुंद गल्ल्यांमधून जात असताना तो एका ठिकाणी पोहोचतो जिथे वर चढण्यासाठी एक लोखंडी शिडी बनवली आहे. जेव्हा तो वर पोहोचतो जातो तेव्हा आणखी एक व्यक्ती तिथे दिसतो. या खोलीत दैंनदिन लागणा-या आवश्यक गोष्टींनी भरलेली आहे. त्याने स्वत:साठी 50 रुपयांची बिर्याणी आणली होती, ती खाल्ल्यानंतर तो कामावर निघून जातो, असेही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+