Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mumbai rain Update : मुंबईत पावसाचा कहर, रेल्वे अन् मोनोरेल सेवा विस्कळीत, पाणीच पाणी! VIDEO

Mumbai Rains Train : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचा मोठा फटका रेल्वे आणि मोनोरेल सेवांना बसला आहे. पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लांब पल्ल्याच्या १४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी, मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.

Mumbai Rains

मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड, प्रवाशांची सुटका

सायंकाळी ६.१५ च्या सुमारास चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान धावत असताना अचानक मोनोरेल बंद पडली. तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलचा एसी बंद झाला. यामुळे आतील प्रवाशांना गुदमरल्याचा त्रास होऊ लागला आणि त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या मोनोरेलमध्ये कोणताही टेक्निशियन नसल्याने प्रवाशांची चिंता वाढली.

या घटनेची माहिती मिळताच, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तीन क्रेनच्या साहाय्याने बचाव मोहीम सुरू करण्यात आली. प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मोनोरेलचा आपत्कालीन दरवाजा तोडण्याची तयारी करण्यात आली. तसेच, महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक घटनास्थळी रवाना झाले असून, नजीकच्या रुग्णालयांनाही सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पावसामुळे लांब पल्ल्याच्या १४ रेल्वे रद्द

मुंबईतील रेल्वे ट्रॅकवर साचलेल्या पाण्यामुळे मध्य रेल्वेवर मोठा परिणाम झाला आहे. याचा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला असून, एकूण १४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या रद्द झालेल्या गाड्यांमध्ये पुणे, जालना आणि धुळ्याला जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे.

रद्द झालेल्या काही प्रमुख गाड्या

  • डेक्कन एक्सप्रेस (मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई)
  • इंद्रायणी एक्सप्रेस (मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई)
  • धुळे एक्सप्रेस (मुंबई ते धुळे आणि धुळे ते मुंबई)
  • जनशताब्दी एक्सप्रेस (जालना ते मुंबई)

याशिवाय, काही गाड्या त्यांच्या नियमित सुरुवातीच्या ठिकाणाऐवजी पुणे किंवा पनवेल येथून पुढे सुरू होतील, असेही रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. या सर्व परिस्थितीमुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

मुंबई मोनोरेल : मोनोरेलमधून बचाव कार्य सुरू

मोनोरेल अडकल्यानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आले. अभियंते आणि अग्निशमन विभाग घटनास्थळी उपस्थित आहेत. मोनोरेलच्या आतील दृश्ये देखील आली आहेत. ट्रेन प्रवाशांनी खचाखच भरलेली आहे. वीज नसल्यामुळे लोकांना श्वास घेता येत नाही त्यांना गुदमरल्यासारखे झाले.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+