मुंबईत अवघ्या 5 तासात 200 मिमी पाऊस, 4 जणांचा मृत्यू, रेल्वे आणि विमान सेवेवर मोठा परिणाम
मुंबई/नवी मुंबई/ठाणे: मुंबई आणि परिसरात बुधवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहराला हादरवून सोडले. सुमारे पाच तास सुरू असलेल्या या पावसाने 4 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहतूक कोंडी झाली आहे. पावसामुळे रेल्वे सेवाही विसक्ळीत झाली आहे.
मुंबई लोकल उशिराने धावत आहे. याशिवाय मुंबई विमानतळावरही अनेक उड्डाणे वळवावी लागली. मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये झालेल्या या मुसळधार पावसामुळे हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करावा लागला. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हा इशारा कायम होता. यानंतर गुरुवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला.

अंधेरी पूर्व येथे पावसामुळे एका 45 वर्षीय महिलेचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. कल्याणमध्ये वीज पडून दगडखाणीत काम करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. याशिवाय झेनिथ धबधब्याजवळ आणखी एका महिलेचा बुडून मृत्यू झाला. कुलाबा येथे 70.4 मिमी तर सांताक्रूझ येथे 94.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मानखुर्द (276 मिमी), घाटकोपर (259 मिमी) आणि पवई (234 मिमी) या उपनगरांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला.
VIDEO | Heavy rainfall lashes Mumbai, leads to waterlogging inside Hanuman Temple in Chembur.
— Press Trust of India (@PTI_News) September 25, 2024
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/dDC2TBuVPE
पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर या दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा काही विस्कळीत झाली होती.विद्याविहारच्या पलीकडे मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने धीम्या लोकल सेवा काही वेळा करीता बंद करण्यात आली होती. ठाणे-कडे जाणाऱ्या मार्गावरील सेवा वेगावरील निर्बंधांसह रात्री 9:10 वाजता पुन्हा सुरू झाली. सीएसएमटीकडे जाणारी मार्गिका पुन्हा सुरू झाली.
शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे
बुधवारी सकाळी 8.30 वाजल्यापासून ठाण्यात 12 तासांत 81 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आणि संध्याकाळी वाहतुकीवर परिणाम झाला. काही भागात झाडे पडल्याने केबल इंटरनेट सेवा विस्कळीत झाली होती. बीएमसी आणि टीएमसीने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.












Click it and Unblock the Notifications