Mumbai rain : राज्यात पुढचे 48 तास धोक्याचे! मुंबईत तुफान पाऊस, आज कुठे होणार बरसात जाणून घ्या अंदाज
Mumbai rain on Orange Alert : दक्षिण ओडिशा व तीव्र कमी दाबाचे क्षेत्र स्थित आहे वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्याची द्रोणिका रेषा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीवर सक्रिय आहे, याचा परिणाम म्हणून राज्यातील कोकण व विदर्भात बहुतांश आणि मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पावासाने कहर केला असून बहुतांश भागात पूरस्थिती आहे.
21 ऑगस्टपासून पावसाची तिव्रता कमी असेल आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील. त्यामुळे आगानी दोन दिवस तरी मुसळधार पावसाचेच आहे. यानंतर मात्र, नागरिकांना थोडाफार दिलासा मिळू शकतो तरीही बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या द्रोणीय रेषेच्या वाटचालीवर पावसाची स्थिती अवलंबून असेल.

Moderate rain or thundershowers very likely to occur at most places over Madhya Maharashtra and Light to moderate rain or thundershowers very likely to occur at many places over Marathwada.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 19, 2025
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या pic.twitter.com/eP1C6rNxhz
राज्याच आज कुठे पडणार पाऊस?
आज 20 ऑगस्ट रोजी रायगड व पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार व तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे
मुंबई, पालघर ठाण्यात आज मुसळधार बरसणार
आज 20 ऑगस्ट रोजी पालघर ठाणे मुंबई रत्नागिरी तसेच नाशिक कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भात आज चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.याया जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुण्यात आगामी 25 ऑगस्टपर्यंत कसे असेल हवामान?
- 20 ऑगस्ट मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (घाट भागात काही ठिकाणी जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे)
- 21 ऑगस्ट सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. (घाट भागात काही ठिकाणी जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे).
- 22 ऑगस्ट सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश, हलक्या पावसाची शक्यता आहे. (घाट भागात काही ठिकाणी जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे).
- 23 ऑगस्ट सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश, खूप हलक्या ते हलक्या पावसाची शक्यता आहे (घाट भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे)
- 24 ऑगस्ट सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश, खूप हलक्या ते हलक्या पावसाची शक्यता आहे
- 25 ऑगस्ट सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश, खूप हलक्या पावसाची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications