Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राज्यासह मुंबईतही तुफान पाऊस! पुढील 24 तास मुसळधार पावसाची शक्यता

Mumbai rains : संपूर्ण राज्यभरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे तसेच अनेक ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे शहरातील काही सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी तिन्ही मार्गांवरील लोकल वाहतूक संथ गतीने सुरु आहे, तर रस्ते वाहतुकीवरही परिणाम होत आहे.

हवामान विभागाने आज 25 जुलै रोजी मुंबई, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, ठाणे, पालघर, सातारा, कोल्हापूर परिसरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

maharashtra weathes Mumbai rains todays update

जोरदार पावसामुळे सकल भागात पाणी...

मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरु असून आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या भागातही जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. वसई विरारमध्येही पावसाने हजेरी लावली असून नवी मुंबईतही तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, वांद्रे, गोरेगाव, बोरीवली येथील सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

ऑरेंज अलर्ट जाहीर..

ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी आज पहाटेपासून तुफान पाऊस सुरु आहे. कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यातील अनेक भागांमध्ये रस्त्यावर पाणी साचले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या चाकरमन्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

24 तास जोरदार पावसाची शक्यता...

पुढील 24 तासात ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, कोल्हापूरच्या घाट विभागात तर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी कोल्हापूर व साताऱ्याच्या घाट विभाग जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या २६ जुलै रोजी रायगड रत्नागिरी पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळ ठिकाणी 24 तासात खूप जोरदार म्हणजेच 116 मिलिमीटर ते 204 मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

आज मुंबईला, उद्या 26 तारखेला सिंधुदुर्ग व 27 ला रत्नागिरी व पुणे व सातारा जिल्ह्याचा घाट विभागात 24 तासात खूप जोरदार तर तुरळक ठिकाणी खूप जोरदार म्हणजे 24 तासांत 116 मिलिमीटर ते 204 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वरील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+