मोठी बातमी: मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; 400 किलो RDX, 34 गाड्यांचा उल्लेख

मुंबईमध्ये गणेश विसर्जन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबई पोलीस गेल्या दहा दिवसांपासून शहराची सुरक्षा चोख बजावत आहेत. उद्या, अनंत चतुर्दशी असल्याने लाखो मुंबईकर विसर्जन मिरवणुकीसाठी रस्त्यांवर उतरतील. याच वेळी, मुंबई पोलिसांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारा एक मेसेज मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.

mumbai police bomb threat anant chaturdashi

व्हायरल मेसेजमधील तपशील

मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर हा धमकीचा मेसेज प्राप्त झाला आहे. या मेसेजमध्ये 'लश्कर-ए-जिहादी' नावाच्या संघटनेच्या 14 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केल्याचा दावा करण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या मेसेजमध्ये 34 गाड्यांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा आणि 400 किलो आरडीएक्समुळे 1 कोटी लोक मृत्युमुखी पडतील असा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे मुंबई पोलिसांवरील जबाबदारी आणखी वाढली असून, त्यांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे.

अनंत चतुर्दशी आणि वाढलेली सुरक्षा

अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेश विसर्जन मिरवणुका निघतात. यामुळे लालबाग-परळ आणि गिरगाव चौपाटी या दोन भागांमध्ये प्रचंड गर्दी होते. लालबागचा राजा, मुंबईचा राजा (गणेशगल्ली), परळचा राजा (नरेपार्क) यांसारख्या मोठ्या मंडळांचे गणपती विसर्जनासाठी निघाल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी लाखो भाविक रस्त्यावर येतात. या गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी अतिरिक्त खबरदारी घेतली आहे.

पोलिसांनी शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी वाढवली असून, संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. मुंबई पोलीस नेहमीच गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी ओळखले जातात, आणि या धमकीनंतर त्यांची सतर्कता आणखी वाढली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+