Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

VIDEO : रेल्वे चिरडणारच.. तेवढ्यात पोलिस देवदुतासारखे आले, मागे खेचले अन् महिलेचा जीव वाचला!

Mumbai News : प्रत्येकजणाला जीवाची मुंबई करणे शक्य होतेच असे नाही. मुंबई शहर तर सर्वांना आपल्या कवेत सामावून घेणारे आहे, पण येथील लोकलने प्रवास करायचा म्हटले तर नवख्या व्यक्तीला जीव मुठीत धरावाच लागतो. गर्दीच एवढी असते की प्रवास करतोय की, मृत्यूशी लढतोय अशीच स्थिती होऊन जाते. लोकलमध्ये चढताना किंवा उतरताना अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत, या घटनांचे व्हिडिओही आपण अनेकदा पाहिलेले आहेत. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या घटनेत एका महिलेचा जीव बालंबाल बचावला.

सोशल मीडियावर आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका पोलिसामुळे मृ्त्यूच्या दाढेत पोहचलेल्या महिलेचे प्राण वाचले. हे सर्व शक्य झाले ते रेल्वे पोलिसाची तत्परता, कार्यकुशलता आणि प्रसंगावधानपणामुळे. हा प्रसंग आहे मुंबईतील बोरिवली रेल्वेस्थानकातील..

Mumbai News

रेल्वे मंत्रालयाने एक्सवर शेअर केला व्हिडिओ

मुंबई स्टेशनवर ट्रेनमधून ओढल्या गेलेल्या महिलेला रेल्वे पोलिसाने वाचवले. यासंदर्भातील एक व्हिडिओ रेल्वे मंत्रालयाने आपल्या X हँडलवर शेअर केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये, ही महिला मुंबईतील बोरिवली रेल्वे स्टेशनवरील असून यात एक महिला चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्यावेळी तिचा अचानक तोल जातो आणि ती थेट रेल्वेस्थानकावर कोसळते.

रेल्वेगाडी आणि स्थानकातील गॅपदरम्यान चाकाखाली जात असतानाच एका रेल्वे पोलिसाला हा प्रकार दिसतो. त्यावेळी प्रसंगावधान राखून रेल्वे पोलिस चाकाखाली जाणाऱ्या महिलेला बाहेर ओढतात आणि तिचा जीव वाचवता असे या व्हिडिओत दिसत आहे.

प्लॅटफार्ममध्ये अडकली होती महिला

रविवारी X वर रेल्वे मंत्रालयाने शेअर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही महिला मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून उतरत असताना कोसळली आणि ती जवळपास ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकली. त्यानंतर फलाटावर उभ्या असलेल्या रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पटकन तिच्याकडे धाव घेत तिला ओढल्याने पुढचा अनर्थ टळला.

रेल्वे प्रशासनाचे आवाहन

घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट करुन रेल्वे प्रशासनाने "कृपया चालत्या ट्रेनमधून चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नका," असे रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांचे होतेय कौतूक

  • एक्सवर पोस्ट झालेल्या व्हिडिओत महिलेला वाचवणाऱ्या रेल्वे पोलिसावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. कमेंटबाॅक्समध्ये अनेक युजर्संनी पोलिसाचे कौतूक केले आहे आणि त्यांना बक्षीस दिले पाहिजे असे म्हटले.
  • "अशा दक्ष आणि समर्पित RPF (रेल्वे संरक्षण दल) अधिकाऱ्यांना प्रवाशांना मदत करण्यासाठी त्यांच्या वेगवान कृतीबद्दल योग्य तो पुरस्कृत करणे आवश्यक आहे. यामुळे नक्कीच त्यांचे मनोबल वाढेल आणि समवयस्कांसाठीही ते प्रेरणादायी ठरेल," असे दुसऱ्या वापरकर्त्याने सांगितले.
  • "छान काम," आणखी एकाने लिहिले. अशा घटना टाळण्यासाठी रेल्वेने गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवावेत, अशी विनंतीही काही वापरकर्त्यांनी केली.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+