बाप रे! एसटी चालवता-चालवता ड्रायव्हर मोबाईलवर बघत होता IPL ची मॅच; महायुती सरकारने उचलले 'हे' पाऊल
एसटी बस चालवताना आयपीएलची मॅच पाहणाऱ्या एसटी महामंडळाच्या ड्रायव्हरला आज निलंबित करण्यात आले. गाडीतील एका प्रवाशाने या ड्रायव्हरचा व्हिडीओ काढून तो राज्य परिवनहन महामंडळाला पाठवला होता. त्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली.

नेमकी काय होती घटना?
ही घटना २२ मार्च रोजी मुंबई-पुणे मार्गावर ई-शिवनेरी बसमध्ये घडली. या बसचा ड्रायव्हर बस चालवताना त्याच्या मोबाईलवर आयपीएलची मॅच पाहत होता. याच बसमधील एका प्रवाशाने या ड्रायव्हरचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्यानंतर प्रवाशाने व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा व्हिडीओ टॅग करण्यात आला. या व्हिडिओची दखल घेत, मंत्र्यांनी तात्काळ एमएसआरटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
चालक बडतर्फे कंपनीलाही दंड
परिवनहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तत्काळ या प्रकाराची गंभीर दखल घेतली. या चालकाला निलंबीत करण्यात आले. तसेच सेवेसाठी जबाबदार असलेल्या खाजगी कंपनीला ५,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला . या संदर्भात मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, 'ई-शिवनेरी ही मुंबई-पुणे मार्गावरील एक प्रमुख सेवा आहे. या बसने बरेच लोक प्रवास करतात. ही सेवा अपघातमुक्त म्हणून ओळखली जाते. बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या आणि प्रवाशांना धोक्यात घालणाऱ्या अशा चालकांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
तयार करणार नवीन नियम
शिस्तबद्ध वाहन चालविण्यासाठी एमएसआरटीसी अंतर्गत कार्यरत खाजगी कंपन्यांनी नियुक्त केलेल्या चालकांना नियमित प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्री सरनाईक म्हणाले, 'अशा तक्रारी आल्या आहेत की ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालक देखील गाडी चालवताना मोबाईल फोनवर सामने किंवा चित्रपट पाहतात, बहुतेकदा ते इअरफोन लावून असतात. वाहतूक विभाग लवकरच अशा पद्धतींविरुद्ध नवीन नियम लागू करेल." अशी माहितीही त्यांन दिली.












Click it and Unblock the Notifications