Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा?

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपल्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज 3 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज्यातील वाढती गुन्हेगारी, कायदा आणि सुव्यवस्था, आरक्षणाचा प्रश्न आणि जातीवाद तसेच आणखी अनेक मुद्द्यांवर या भेटीत चर्चा केल्याचे समजत आहे.

राज्यात सध्या गाजत असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि जातीवाद या विषयावर राज ठाकरेंनी चर्चा केल्याचे समजत आहे. बैठकीला मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी भूषण गगराणी देखील उपस्थित आहेत. दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता विविध विषयांवर देखील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली.

raj thackeray

मागील काही महिन्यांपासून राज्यात वाढती गुन्हेगारी तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण गंभीर बनत चाललं आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यातच उरण येथील यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीच्या हत्येने अख्या महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. यावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई तसेच मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे, अजित अभ्यंकर, वैभव खेडेकर,अभिजित पानसे आणि इतर पदाधिकारी देखील वर्षा निवासस्थानी उपस्थित होते. या चर्चेला मनसेच्या शिष्टमंडळासह राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत.

राज्य प्रशासनातील मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर सिंह, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव सचिव दीपक कपूर, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, तसेच गृह विभाग वित्त विभाग, एमएमआरडीए आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+