मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आणखी एक मेट्रो, असा आहे मेट्रो मार्ग
Mumbai Metro : मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई मेट्रो लाइन 2बी (Yellow Line) च्या पहिल्या टप्प्याची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी लवकरच हे मेट्रो मार्ग उघडण्याची शक्यता आहे. मंडाले मेट्रो स्टेशन ते डायमंड गार्डन या दरम्यानचा 5.39 किलोमीटरचे अंतर या ट्रायल रनमध्ये समाविष्ट आहे, यामध्ये मंडाले, बीएसएनएल, शिवाजी चौक, डायमंड गार्डन आणि मानखुर्द अशी पाच स्टेशन्स येतात. ही मेट्रो लाइन, जी डीएन नगर (अंधेरी) ते मंडाले (मानखुर्द) या 23.6 किलोमीटरच्या मार्गावर 22 स्टेशन्स जोडणार आहे, मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारी महत्त्वाची दुवा ठरणार आहे.

ट्रायल रन सुरू: पहिल्या टप्प्याची सुरुवात
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRDA) ने 16 एप्रिल 2025 पासून मेट्रो लाइन 2बीच्या पहिल्या टप्प्याचे ट्रायल रन सुरू केले आहे. हा ट्रायल रन मंडाले ते मानखुर्द या 5.39 किलोमीटर पर्यंत केंद्रित आहे, ज्यामध्ये पाच स्टेशन्सचा समावेश आहे. या ट्रायल रनचा उद्देश मेट्रोच्या सुरक्षितता, गती आणि तांत्रिक कामगिरीची चाचणी करणे हा आहे. MMRDA च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे अंतर यशस्वी झाल्यास पुढील टप्प्यांसाठी मार्ग मोकळा होईल. या लाइनवर एकूण 20 स्टेशन्स असतील, ज्यापैकी काही स्टेशन्सचे बांधकाम अजूनही प्रगतिपथावर आहे.
ट्रायल रन दरम्यान मेट्रो ट्रेन्सची गती, सिग्नलिंग सिस्टम आणि प्रवाशांसाठीच्या सुविधांचे मूल्यमापन केले जाईल. या प्रक्रियेत स्थानिक प्रशासन आणि MMRDA चे तज्ज्ञ सहभागी आहेत. ट्रायल रन यशस्वी झाल्यास MMRDA लवकरच या मार्गाचा पहिला टप्पा सामान्य प्रवाशांसाठी उघडण्याचा विचार करत आहे, ज्याची तारीख डिसेंबर 2025 च्या आसपास ठरू शकते. हे वेळापत्रक MMRDA च्या अधिकृत सूचनांवर अवलंबून आहे, परंतु सध्या प्रगतीचा वेग पाहता ही शक्यता अधिक आहे.
मेट्रो लाइन 2बी काम प्रगती पथावर
मेट्रो लाइन 2बीचे बांधकाम सध्या 70% पूर्ण झाले आहे, ज्यामध्ये नागरी कामे (सिव्हिल वर्क) आणि ट्रॅक लेइंगवर प्रगती दिसून येते. MMRDA च्या माहितीनुसार मंडाले येथील कार शेडचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून हे कार शेड 31 एकर जागेवर उभारले गेले आहे, जिथे 72 मेट्रो ट्रेन थांबू शकतात. ट्रॅक वर्क आणि आर्किटेक्चरल फिनिशिंगवरही वेगाने काम सुरू आहे.
मेट्रो लाइन 2बीचा पहिला टप्पा
MMRDA च्या मते मेट्रो लाइन 2बीचा पहिला टप्पा डिसेंबर 2025 पर्यंत प्रवाशांसाठी उघडण्याची शक्यता आहे. हा टप्पा मंडाले ते डायमंड गार्डन पर्यंत सुरू होईल. हा टप्पा 5.39 किलोमीटरचा आहे. संपूर्ण 23.6 किलोमीटरचा मार्ग ऑक्टोबर 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मेट्रो लाइन 2बीचा पहिला टप्पा सुरु झाल्यानंतर मुंबईच्या दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण सध्याच्या वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळेल. विशेषतः बीकेएस आणि चेंबूर यासारख्या वर्दळीच्या भागात प्रवास करणाऱ्यांसाठी ही मेट्रो लाइन वरदान ठरणार आहे. MMRDA च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या लाइनमुळे प्रवासाचा वेळ 50% ते 75% पर्यंत कमी होईल, ज्यामुळे इंधनाची बचत आणि प्रदूषण नियंत्रणात मदत होणार आहे.












Click it and Unblock the Notifications