Mumbai Metro : 10 लाख प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई मेट्रो लाईन 2B या आठवड्यात सुरू होणार
Mumbai Metro : मुंबई लोकल जशी मुंबईकरांचा श्वास आहे तशीच मुंबई मेट्रो सुद्धा आता प्रवाशांची धमनी बनण्याच्या तयारीत आहेत.एमएमआरडीएने एक मोठी बातमी दिली आहे. मंडाले आणि डायमंड गार्डन लाईन 2B वर या आठवड्यात मेट्रो सुरू होणार आहे.
मंडाले डेपो लाइन 2B साठी महत्त्वपूर्ण आहे. मांदळे, मानखुर्द येथे 31.4 हेक्टर सरकारी मालकीच्या भूखंडावर डेपो बांधला जात आहे. एमएमआरडीए टप्प्याटप्प्याने मेट्रोचे जाळे विस्तारत असून आता ही लाइनही वेगाने तयार केली जात आहे.

टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) 8 एप्रिलपासून - मंडाले ते डायमंड गार्डनपर्यंत - मेट्रो लाईन 2B च्या 5.6 किमी लांबीच्या विस्तारासाठी तयार आहे.
एमएमआरडीए मंडाले आणि डायमंड गार्डनदरम्यान मेट्रो लाईन 2 बी च्या 5.6 किमी लांबीच्या भागाला ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर (ज्याला ओव्हरहेड इक्विपमेंट किंवा ओएचई म्हणतात) मेट्रो ट्रेनला वीज पुरवठा करणार आहे, याचा अर्थ सेवा लवकरच सुरु होणार आहे असा होतो.
टप्प्याटप्प्याने सुरू होणाऱ्या पूर्ण 23.6-किमी एलिव्हेटेड मेट्रो लाईन 2B चे उद्घाटनाच्या आयोजनासंदर्भातील प्रक्रीयेला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे मेट्रोची या मार्गावर चाचणी घेणे प्रवासीसेवेसाठी सज्ज होण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असल्याचे एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे. वर्ष संपण्यापूर्वी मंडाले आणि डायमंड गार्डन दरम्यान सेवा सुरू करण्याचे आमचे ध्येय आहे."
मेट्रो लाइन 2B सेवेमुळे दहा लाख प्रवाशांना फायदा
मेट्रो लाइन 2B डी एन नगर (पश्चिम मुंबई) ते मांडले (पूर्व मुंबई) ला जोडेल. ती वांद्रे, कुर्ला आणि चेंबूर सारख्या महत्त्वाच्या भागातून जाईल आणि लाखो लोकांचा प्रवास सुरळीत होईल.
हा विस्तीर्ण मेट्रो लाइन 2 कॉरिडॉरचा एक भाग आहे, ज्यामध्ये लाइन 2A देखील समाविष्ट आहे. हा मार्ग पुर्णपणे सुरु झाल्यानंतर रोज किमान 10 लाख प्रवाशांची वाहतूक अपेक्षित आहे,
या लाईनचा फायदा काय?
- मेट्रो लाईन 2 मुळे जलद वाहतूक सेवा मिळेल.
- सुमारे दहा लाख प्रवाशांना या लाईनची सेवा मिळेल आणि त्यांचा प्रवास सुरक्षित आणि गतमान होईल.
- ज्या परिसरात मेट्रोचे जाळे आहे त्या भागातील लोकांना जलद सेवा मिळेल.
- या मेट्रो सेवेमुळे खासगी वैयक्तिक वाहतुकीचा वापर टाळला जाईल पर्यायाने रस्त्यावरील रहदारी आणि प्रदूषण कमी होईल.












Click it and Unblock the Notifications