Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mumbai Metro: सिद्धीविनायकाचे दर्शनाला उद्यापासून मेट्रोने जाता येणार! मेट्रो-3, फेज-2 चे लोकार्पण

Mumbai Metro 3 : देशातील सर्वात लांब BKC ते आचार्य अत्रे चौकांपर्यंत 9 किमीचा मेट्रो - 3 चा पल्ला उद्यापासून खुला होणार आहे. यासंबंधीची घोषणा खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

उद्या सकाळपासून नियमितपणे मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2-अ सुरू होणार असून सर्व अडचणींना पार करून मेट्रो अंतिम टप्प्यात आली आहे. तिसरा टप्पाही ऑगस्ट 2025 पर्यंत सुरु होईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Mumbai Metro 3 Phase 2 inaugurated

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मेट्रो-3 ही देशातील सर्वात लांब आणि सिंगल भुमिगत मेट्रोल लाईन आहे, तिचा टप्पा 2-A हा सुरु होत आहे. कफ परेडपासून आरे-6 पर्यंत एकूण 33 किलोमीटरची लांबी आहे. यापैकी तेरा किमीची लांबीवर मेट्रो सुरु केली होती, त्यानंतर आज नऊ किमीच्या लांबीवर मेट्रो सुरु केली जात आहे.

दुसऱ्या टप्प्यात हे मार्ग

बीकेसीपासून आचार्य अत्रे चौकांपर्यंत नऊ किमीचा मेट्रो तीनपर्यंतचा पल्ला जनतेकरीता खुला करत आहोत अशी घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. उद्या सकाळपासून याचे ऑपरेशन्स सर्वांसाठी खुले असतील असेही ते म्हणाले.

मुंबईकरांसाठी ही खास सोय..

मुंबईकरांना गर्दीतून वाट काढत आपले इच्छित स्थळ गाठावे लागते. अशा स्थितीत आता मेट्रो 3 च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाले आहे. अशातच भुयारी मार्गाने वरळी ते आरे हा प्रवास केवळ 36 मिनिटांत पुर्ण होणार आहे. मेट्रो 3 च्या पहिल्या टप्पाला ऑक्टोबर 2024 मध्ये सुरुवात झाली होती. त्यानंतर आता उद्यापासून मेट्रो फेज 2 ची सुरवात होत आहे, त्यात नऊ किलोमीटरच्या बीकेसी ते आचार्य अत्रे स्टेशन म्हणजेच वरळी नाका स्टेशनपर्यंत गर्दीशिवाय प्रवास करता येणार आहे. म्हणजेच मेट्रोतून प्रवास केला तर सिद्धिविनायकाचे दर्शनासाठीचा प्रवासही सोपा होणार आहे.

33 किमीच्या मार्गावर 26 स्टेशन

आपला टनेल मिठीनदीच्या खालून आला आहे. दोन स्टेशनचे काम अंतीम टप्प्यात आहे. आतापर्यंतचा मेट्रोचा जेवढा भाग खुला झाला त्याला प्रतिसाद मिळत आहे. एकूण 26 स्टेशन या संपूर्ण 33 किमीच्या मार्गावर आहेत. मल्टीपल एंट्री असल्याने गर्दी होणार आहे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सिंगल प्लॅटफार्म सिंगल तिकीट योजना

मेट्रोने विमानतळ गाठता येणार यासाठी आमचा प्रयत्न आहे. यावर्षी आणि पुढच्या वर्षीपर्यंत प्रत्येकी पन्नास किमीचे जाळे तयार करायचे आहे. सिंगल प्लॅटफार्म सिंगल तिकीट यात बस, मोनो रेल असो की, लोकल मेट्रो हा प्रयोग यशस्वी झाला असून त्याची चाचणी सुरु आहे. त्यानंतर मुंबईकरांना ही सुविधा देऊ असेही ते म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+