मुंबईची ट्रॅफिक बघायचीचं असेल तर हे दृष्य नक्की पाहा ! डोळे चक्रावून जातील
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केल्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. राज्यभरातून लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली असून, त्याचा परिणाम रेल्वेसेवेवरही दिसून येत आहे.

रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी
गणपतीच्या उत्साहाच्या वातावरणातच मराठा आंदोलनामुळे मुंबईत गर्दी वाढली आहे. रस्ते वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक आंदोलकांनी लोकल ट्रेनचा पर्याय निवडला आहे. यामुळे सीएसएमटी (CSMT) आणि चर्चगेट रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. कल्याण आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन तुडुंब भरून धावत आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे १० मिनिटे उशिराने सुरू आहे.
Mumbai traffic scenes on Coastal Road near Breach Candy exit. pic.twitter.com/iCDKRAuBSp
— Richa Pinto (@richapintoi) August 29, 2025
रस्ते वाहतुकीची कोंडी
आंदोलकांमुळे ईस्टर्न फ्री वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. आंदोलकांच्या शेकडो गाड्या रस्त्यावर आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मानखुर्द परिसरात सायन-पनवेल महामार्गावरही वाहतूक संथ झाली आहे. गुगल मॅप्सवर अनेक रस्ते 'लाल' रंगात दिसत असल्याने वाहतुकीची स्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट होते.
Massive Jam on Eastern Freeway🛑
— Mumbai Nowcast (@s_r_khandelwal) August 29, 2025
Rally in Azad Maidan causing Traffic Disruption. Avoid taking Eastern Freeway. Some roads are closed. Plan your travel accordingly pic.twitter.com/8EPb87ODyc
वाहतुकीच्या नियमांत बदल आणि पोलिसांचा सल्ला
मुंबई वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. काही महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतुकीला निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये, वाशीहून पांजरपोळ फ्रीवेकडे जाणारे रस्ते आणि छेडानगरहून फ्रीवेकडे जाणारे रस्ते बंद आहेत. पोलिसांनी बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना वाशी रेल्वे स्टेशनबाहेर आपली वाहने पार्क करून लोकल ट्रेनने मुंबईत येण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.












Click it and Unblock the Notifications