Mumbai local train: मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, जाणून घ्या एका क्लिकवर
Mumbai local train: मुंबई लोकच्या तीन्ही मार्गावर लोकल ट्रेनच्या ऑपरेशनमध्ये मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे मुंबई लोकल ट्रेन सेवेवर परिणाम होणार आहे. मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी आणि पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते चर्चगेट या स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे मेगा ब्लॉक
दरम्यान हा ब्लॉक रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत असेल. या जंबो ब्लॉकचा उद्देश ट्रॅक, सिग्नलिंग सिस्टम आणि ओव्हरहेड उपकरणे अद्ययावत करणे आणि दुरुस्त करणे आहे. या कालावधीत या विभागातील सर्व जलद मार्गाच्या गाड्यांना धीम्या मार्गावर धावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या देखभालीच्या कामांमुळे अनेक उपनगरीय गाड्या रद्द केल्या जातील आणि चर्चगेटला जाणाऱ्या काही गाड्या वांद्रे किंवा दादर स्थानकांवरून लवकर थांबतील किंवा त्यांचे मार्ग वळवले जातील. या बदलांबद्दल अधिक तपशीलवार माहिती हवी असलेले प्रवासी त्यांच्या स्थानिक स्टेशन मास्टरशी संपर्क साधू शकतात.
मध्य रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या मार्गावर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. तसेच ठाण्याच्या पुढे जाणा-या या जलद गाड्या डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा यादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवला जाणार आहेत. त्यामुळे या सेवा अंदाजे 15 मिनिटांनी उशीराने धावतील.
हार्बर रेल्वे मार्ग मेगाब्लॉक
हार्बर रेल्वे मार्गावरी कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉकचे असणार आहे. त्यामुळे सीएसएमटीहून पनवेल, बेलापूर, वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आळी आहे. तसेच ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाचे पाऊल उचलत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी 238 नवीन वातानुकूलित लोकल ट्रेनना मंजुरी देण्याची घोषणा केली आहे. संसदेच्या अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली आहे. मुंबई लोकल ट्रेन सेवा सुधारण्यासाठी एक महत्वाचं पाऊल असणार आहे.
रेल्वेचे हे पाऊल शहराच्या वाहतूक पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि अधिक आरामदायी आणि कार्यक्षम रेल्वे सेवांची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील लोकल ट्रेनच्या सध्याच्या स्थितीचे भयानक चित्र मांडलं होतं. गायकवाड यांनी अधिक एसी लोकल ट्रेनची गरज यावर भर दिला होता. रेल्वे अपघातांमध्ये होणाऱ्या जीवितहानी आणि जखमींचे कारण सांगून त्यांनी दैनंदिन प्रवाशांना येणाऱ्या आव्हानांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचे आवाहन रेल्वेमंत्र्यांना केले होते.












Click it and Unblock the Notifications