Video Viral : मुंबईत लोकल ट्रेनमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी, रक्तबंबाळ होईस्तर झोडपलं, कारण काय?
Mumbai Local Train Video Viral : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कसा घडला प्रसंग!
मिळालेल्या माहितीनुसार तसेच व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, महिला डब्यात उभ्या राहण्याच्या कारणावरुन सुरू झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर कालांतराने थेट जोरदार हाणामारीत झाले. एकमेकींना शिवीगाळ करत, एकमेकींचे केस ओढत आणि चापटा-बुक्क्यांनी जोरदार मारत महिलांनी परस्परांवर जबरदस्त हल्ला केला. या हाणामारीचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरुण तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, लोकल ट्रेनमध्ये असलेल्या अन्य महिलांनी या हाणामारीचा व्हिडिओ त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. या व्हिडिओ दिसल्याप्रमाणे एकमेकीचे डोके फुटेपर्यंत रक्तबंबाळ होईपर्यंत या महिलांची हाणामारी झाल्याचे या ट्रेनमध्ये घडले. घटना कोणत्या लोकलमधील आहे, कधी घडली आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे पोलिसांकडून या व्हिडिओची चौकशी केली जात आहे.
लोकलमध्ये महिलांमध्ये जुंपली,व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल, हा व्हिडीओ कधीचा आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही | Viral Video #Mumbai #Local #Video #Crime pic.twitter.com/syn8KTtfsi
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) June 20, 2025
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!
ही घटना नेमकी कोणत्या मार्गावरील लोकलमध्ये घडली हे स्पष्ट झालेलं नसून, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे किंवा हार्बर मार्ग यापैकी कुठल्यातरी मार्गावर ही गोंधळाची घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित महिलांमध्ये जागा मिळवण्यावरून वाद झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
काही प्रवाशांनी मात्र हा वाद वैयक्तिक कारणावरून झाला असावा, असा अंदाज देखील व्यक्त केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या घटनेतील महिलांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी केली आहे.
लोकल ट्रेनमध्ये असा घटना वारंवार घडतात?
महिला डब्यात गर्दी ही नित्याची बाब आहे. सकाळी आणि संध्याकाळी कामावर जाणाऱ्या महिलांमुळे लोकल ट्रेनमध्ये जागेवरून किंवा गर्दीतील ढकला-ढकलीवरून अनेकदा वाद निर्माण होतात. पण या वादांना इतक्या टोकाला नेणं आणि थेट मारहाण करणे हे नक्कीच चिंताजनक आहे.
यामुळे इतर प्रवासी महिलांमध्ये भीतीचं वातावरण तयार होतं. रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी याप्रकरणी दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे. तसेच महिला डब्यात सुरक्षा वाढवण्याची गरजही असल्याचं चित्र आहे.












Click it and Unblock the Notifications