Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mumbai Local Train: मुंबई लोकल ट्रेन अपडेट, 22 एप्रिल रोजी यावेळेत असणार चार तासांचा मेगाब्लॉक

Mumbai Local Train: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकल ट्रेन ही वाहतुकीचे मुख्य साधन आहे. लोकल ट्रेनच्या प्रवाशांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने 22 एप्रिल 2025 रोजी रात्री दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान चार तासांचा वाहतूक आणि पॉवर ब्लॉक राहणार असल्याची घोषणा केली आहे. या ब्लॉकमुळे लोकल आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहीतीनुसार, रेल्वे ट्रॅक दुरुस्ती, तांत्रिक काम आणि सिग्नलिंग अपग्रेडेशनसाठी हा ब्लॉक आवश्यक आहे. मुंबईकरांनी घरातून बाहेर पडण्यापुर्वी वेळापत्रक पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

mumbai local train update

मुंबई लोकल ट्रेन: ब्लॉक वेळापत्रक

तारीख: 22 एप्रिल रात्री ते 23 एप्रिल सकाळपर्यंत

वेळ: पहाटे 1:00 ते पहाटे 5:00

ठिकाण: दिवा आणि मुंब्रा दरम्यान

मार्ग: अप आणि डाउन दोन्ही मार्गांवरील गाड्यांवर परिणाम

Mumbai Local Train: कोणत्या सेवांवर परिणाम होईल?

काही लोकल गाड्या अंशतः रद्द केल्या जातील. काही मेल/एक्सप्रेस गाड्या इतर मार्गावर वळवल्या जाऊ शकतात किंवा त्यांचे वेळापत्रक बदलले जाऊ शकते. याशिवाय, धीम्या आणि जलद लोकल गाड्यांच्या वेळेत बदल शक्य आहे. अशा परिस्थितीत मुंबई आणि ठाणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

रेल्वेने काय म्हटले?

"दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान 22-23 एप्रिलच्या रात्रीपासून वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी प्रवास करण्यापूर्वी अपडेट तपासावे, तसेच गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत," असे मध्य रेल्वेने आपल्या अधिकृत 'एक्स' या सोशल मिडिया प्लेटफॉर्मवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

प्रवाशांना आवाहन

रेल्वेने प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या देखभाल आणि सुरक्षिततेच्या कामासाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान अतिरिक्त वेळेचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+