Mumbai Local Train : ज्येष्ठ नागरिकांसाठी आता कोच असलेली लोकल ट्रेन! कुठून धावणार? जाणून घ्या
Mumbai Local Train Special coaches reserved for senior citizens : मुंबईतील लोकलला होणारी अफाट गर्दी आणि त्या गर्दीतून कसे बसे वाट काढत रेल्वेत चढणारे ज्येष्ठ नागरिक ही स्थिती मुंबईतील प्रवाशांनी अनेकदा पाहिली. यात एवढ्या गर्दीत ज्येष्ठांचे मोठ हाल होतात. प्रसंगी गंभीर घटनांनाही त्यांना तोंड द्यावे लागते अशा स्थितीत आता एक खूशखबर पुढे आली आहे. ज्येष्ठ नागरीकांसाठी कोच असलेली पहिली मुंबई लोकल ट्रेन सुरु करण्यात आली आहे.
वनइंडिया हिंदीने यासंदर्भात वृ्त्त दिले आहे. मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिली लोकल गाडी सुरु करण्यात आल्याने ही दिलासा देणारी बाब आहे तर या सुविधेचे स्वागतही होत आहे. हा कौतुकास्पद निर्णय मुंबईच्या उपनगरीय लोकल ट्रेनमध्ये वृद्धांची होणारी परवड लक्षात घेऊन करण्यात आला आहे. यासंदर्भात याचिकाही न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सोय
वनइंडियाच्या वृत्तानुसार, रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांच्या सोयी आणि सुरक्षिततेचा विचार करून लोकल ट्रेनच्या एका मालवाहू डब्यांचे रूपांतर ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित विशेष कोचमध्ये केले आहे. माटुंगा स्थानकावर ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित कोच असलेली लोकल ट्रेन तयार आहे, जी वृद्ध प्रवाशांना सुरक्षितता आणि आराम देईल.
कशी आहे ज्येष्ठांसाठीचा विशेष कोच
ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकल ट्रेनमधील समर्पित कोच हा सामान आणि शारीरिकदृष्ट्या अपंग लोकांसाठी राखीव असलेल्या कोचसारखाच आहे. मध्य रेल्वेच्या (CR) माटुंगा वर्कशॉपने ही ट्रेन येत्या काही दिवसांत सप्टेंबर २०२६ पर्यंत उर्वरित १६३ गाड्यांमध्येही बदल केले जातील. ही ट्रेन या आठवड्यापर्यंत ट्रॅकवर सुरू होण्याची अपेक्षा आहे.
ज्येष्ठ नागरीकांचा प्रवास होणार सोपा
ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सोपा होईल या समर्पित कोचमुळे ज्येष्ठ नागरिकांना उपनगरीय गाड्यांमध्ये चढताना किंवा उतरताना येणाऱ्या त्रासांपासून सुटका मिळेल, विशेषतः गर्दीच्या वेळेत आरामदायी आणि सुरक्षित प्रवास सुनिश्चित होईल. याशिवाय, पश्चिम रेल्वेने १०५ नॉन-एसी ईएमयू रेक्समधील सामानाच्या डब्यांचे ज्येष्ठ नागरिक डब्यांमध्ये रूपांतर करण्याची योजना आखली आहे, ज्या प्रत्येक डब्यात १३ आसने आणि ९१ प्रवाशांसाठी जागा असेल.
न्यायालयात दाखल केली होती याचिका
सप्टेंबर २०२४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेला ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव जागा निर्माण करण्याचे निर्देश दिल्यानंतर लोकल गाड्यांमध्ये बदल सुरू करण्यात आले आहेत. वकील आणि निवृत्त सरकारी कर्मचारी के. पी. पुरुषोत्तम नायर यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाख केली होती. त्यांनी मुंबई उपनगरीय गाड्यांमध्ये शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी असलेल्या कोचप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कोचची मागणी केली होती.
यावर रेल्वेतर्फे न्यायालयाला सांगितले होते की, रेल्वे बोर्डाने या सुधारणांच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे, पुढील दोन वर्षांत विद्यमान रेल्वे सेवांमध्ये व्यत्यय न आणता राबवली जाईल.तसेच "मध्य रेल्वेच्या माटुंगा कार्यशाळेने मुंबई उपनगरीय नेटवर्कमध्ये वृद्ध प्रवाशांसाठी समर्पित कोच असलेला पहिला इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (EMU) रेक सुरू केला आहे," असे सीआर प्रवक्त्याने सांगितले.












Click it and Unblock the Notifications