मुंबई लोकल संदर्भात मोठी अपडेट, मेगाब्लाॅकमुळे आज आणि उद्या लोकलच्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या
Mumbai Local Train News : मुंबई लोकल ट्रेनसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे, मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सोईसाठी वेळोवेळी तत्पर असते. या माध्यमातून प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यास प्राधान्य दिले जाते. अशातच वाशी रेल्वेस्थानकावर इलेक्ट्राॅनिक इंटरलाॅकींग सिस्टीम तयार केली जाणार आहे. त्यासाठी आज ७ ऑगस्ट आणि उद्या ८ ऑगस्टला मुंबई लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात बदल केले जात आहेत.

लोकल ट्रेन सेवेत होणार बदल
सेंट्रल रेल्वेने वाशी स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम बसवण्याचे काम या काळात सुनियोजित आणि सुयोग्य पद्धतीने जलद केले जाईल. यादरम्यान, 7 ते 8 ऑगस्ट दरम्यान काही लोकल ट्रेन सेवांवर परिणाम होणार आहे. हे आपण खाली जाणून घेऊया.
वाशी स्थानकादरम्यान मेगाब्लॉक
वाशी स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम करण्यासाठी आजपासून रात्री 10:45 ते पहाटे 3:45 पर्यंत मेगाब्लॉक असेल.
कोणत्या सेवा प्रभावित होणार
या मेगाब्लॉकमुळे हार्बर लाईनवरील लोकल ट्रेन सेवा प्रभावित होतील. वाशी आणि पनवेल दरम्यानच्या लोकल सेवा या काळात पूर्णपणे बंद राहतील.
रद्द झालेल्या ट्रेन कोणत्या
- वाशीहून पहाटे 4:03, 4:15, 4:25, 4:37, 4:50 आणि 5:04 वाजता सुटणाऱ्या अप लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
- सीएसएमटीहून रात्री 9:50, 10:14 आणि 10:30 वाजता सुटणाऱ्या डाउन लोकल सेवाही रद्द राहतील.
या आहेत मार्ग बदललेल्या ट्रेन
- बेलापूरहून रात्री 8:54 वाजता सीएसएमटीकडे जाणारी लोकल वाशीपर्यंतच जाईल.
- बेलापूरहून रात्री 9:16 वाजता सीएसएमटीकडे जाणारी लोकल वडाळा रोडपर्यंतच जाईल.
- वांद्रेहून रात्री 10:00 वाजता सीएसएमटीकडे जाणारी लोकल वडाळा रोडवर थांबेल.
- पनवेलहून रात्री 10:55 आणि 11:32 वाजता वाशीसाठी सुटणाऱ्या लोकल नेरुळपर्यंतच धावतील.












Click it and Unblock the Notifications