Mumbai local : मुंबई लोकल रेल्वे प्रवाशांनो आज 29 जूनला मेगाब्लाॅक! 'हे' रेल्वे मार्ग होतील प्रभावित
Mumbai local train mega block today : मुंबई लोकल रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे, आज रविवारी काही मार्गावर मेगाब्लाॅक मध्य रेल्वेने जाहीर केला आहे. त्यामुळे २९ जून २०२५ रोजी आज मुंबईकरांना रेल्वे प्रवासात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक तपासूनच निघा.

कधी आहे मेगाब्लाॅक?
देखभाल आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणांच्या कामांमुळे मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक राबविला जात आहे. आज रविवार, २९ जून रोजी सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत विविध रेल्वे मार्गांवर ब्लॉक राहील, त्यामुळे रेल्वेप्रवास प्रभावित होईल.
कोणते मार्ग सामान्य राहतील?
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून धावणाऱ्या डाउन फास्ट/सेमी-फास्ट लोकल गाड्या सकाळी ९.३४ ते दुपारी ३.०३ वाजेपर्यंत ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान स्लो मार्गावर वळवल्या जातील. ट्रॅकची देखभाल, ओव्हरहेड वायरची दुरुस्ती आणि सिग्नलिंग सिस्टमसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
कल्याणहून धावणाऱ्या अप जलद आणि अर्ध जलद गाड्या सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० पर्यंत अप स्लो मार्गावरून धावतील. या गाड्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवरही थांबतील.
मुलुंड स्थानकापूर्वी, या गाड्या जलद मार्गावर परत येतील आणि नियोजित वेळेपेक्षा सुमारे १० मिनिटे उशिराने शेवटच्या स्टेशनपर्यंत पोहोचतील.
हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा राहील प्रभावित
- रविवारी हार्बर मार्गावर वाशी आणि पनवेल दरम्यानच्या अप आणि डाउन रेल्वे सेवा सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत प्रभावित होतील.
- पनवेलहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप रेल्वे सेवा सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत उशिराने धावतील.
- पनवेल आणि बेलापूरहून सीएसएमटीसाठी निघणाऱ्या डाउन सेवा सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत पूर्णपणे रद्द केल्या जातील.
- प्रवाशांच्या सोयीसाठी ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी विभागात विशेष लोकल गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
ट्रान्स-हार्बर मार्गावरही लोकल वाहतूक प्रभावित
ट्रान्स-हार्बर मार्गावरही लोकल वाहतूक प्रभावित होतील. रविवारी, ठाणे आणि वाशी स्थानकांदरम्यान धावणाऱ्या ट्रान्स-हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा देखील सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत प्रभावित होतील.
ठाणे ते पनवेल पर्यंतच्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील गाड्या सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत रद्द राहतील. त्याच वेळी, पनवेल ते ठाणे पर्यंतच्या डाउन ट्रेन सेवा सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत रद्द राहतील.
या मार्गावर मेगा ब्लाॅक राहणार नाही
आज, रविवारी उरण मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावर (पश्चिम रेल्वे) कोणताही मेगा ब्लॉक राहणार नाही. या मार्गांवरील लोकल गाड्या त्यांच्या सामान्य वेळापत्रकानुसार धावतील.












Click it and Unblock the Notifications